Hindi, asked by govind89, 1 year ago

information about major dhayan chand in marathi​

Answers

Answered by madhumita40
0

Answer:

please find answers in google

Answered by narendramodi24519
1

Answer:

भारतीय हॉकीतील नव्हे तर हॉकी विश्वातील सर्वात महान खेळाडू म्हणून आजही मेजर ध्यानचंद यांचे नाव आदराने घेतले जाते. हॉकीतील जादूगार अशीच त्यांची जगभरात ओळख आहे. त्यांच्या जन्मदिनानिमित्त भारतात २९ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो.

हॉकीतील त्यांचे योगदान व देशाप्रतीचा असणारा अभिमान यामुळे त्यांना आजही आदराचे स्थान आहे. अशा या महान खेळाडू विषयी आज जाणून घेऊयात…..

मेजर ध्यानचंद यांचा जन्म २९ ऑगस्ट १९०५ ला अलाहाबादमध्ये झाला. वडील सामेश्वरसिंग सैन्यात असल्यामुळं कुटुंबाचं स्थलांतरण कायम ठरलेलं. त्यामुळे ध्यानसिंग यांना जास्त शिकता आलं नाही. त्यांचं ६ वी पर्यंत शिक्षण झालं. वयाच्या १६ व्या वर्षी ते सैन्यात भरती झाले. पैलवान बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या ध्यानसिंग यांना सुरूवातीच्या काळात हॉकीबद्दल फारसं आकर्षण नव्हतं. पण सैन्यदलात रंगणाऱ्या हॉकीच्या सामन्यांमुळे त्यांची हॉकीशी ओळख झाली.

Similar questions