India Languages, asked by rishikeshoza, 1 year ago

information about neem tree in marathi

Answers

Answered by manvi22
14
अमेरिकेत एका संशोधन शाखेत १९९२ साली प्रसिद्ध झालेल्या संशोधनाचे निष्कर्ष ‘निम ए ट्री फॉर सोल्व्हिंग ग्लोबल प्राब्लेम्स’ या पुस्तकात सांगितले गेले आहे. सध्या जगापुढे असलेल्या पर्यावरण संरक्षण, वाळवंटाची होणारी वाढ, रासायनिक कीटकनाशकांमुळें अन्नात व पाण्यात वाढलेले विषारी द्रव्यांचे प्रमाण ह्या सर्व समस्यांवर कडूनिंबाचे झाड उपयोगी पडू शकते. अनेक आजारांवर याची पाने, फुले, साल उपयोगी पडू शकते. तसेच डॉक्टरांच्या संशोधनानुसार ‘एड्स’ सारख्या दुर्धर रोगांवर कडूनिंबापासून बनवलेले औषध उपयोगी पडते.
Answered by rehankhan2007
7

Answer:

निंबोळ्या

लिंब (किंवा कडुलिंब, बाळंतलिंब; शास्त्रीय नाव: Azadirachta indica; कुळ : Meliaceae) हा भारतीय उपखंडातील पाकिस्तान, भारत, नेपाळ व बांगलादेश या देशात आढळणारा एक वृक्ष आहे. या वृक्षाची पाने कडू असल्याने त्याला कडुनिंब म्हटले जाते. या झाडामुळे प्रदूषण होत नाही.

kadulimb== वर्णन == कडुलिंब हा मोठा, ३०-६० फूट उंच वाढणारा छायादार वृक्ष आहे. याला साधारणत: ९ ते १५ इंच लांब देठ व त्यास सम अंरावर, हिरव्या रंगाची २-३ सेंटिमीटर लांबीची, टोकदार, करवतीसारखे दाते असणारी ९ ते १५ पाने येतात . पानांच्या दोन्ही बाजू वेगवेगळ्या (oblique leaf ) सुरू होतात. कडुलिंबाची फुले पांढरी, लहान व सुगंधित असतात. तर फळे आधी हिरवी व पिकल्यावर पिवळी होतात. जवळपास ३-४ मिलिमीटर लांब असलेल्या या फळांत प्रत्येकी एक बी असते.त्या बियांना निंबोळीकिंवा लिंबोणी असे म्हणतात. कडुलिंबाच्या लाकडाचा वापर इमारतीत व पेट्या वगैरे बनविण्यासाठी होतो.

कढुनिंब हे संपूर्ण भारतात आढळणारे, नैसर्गिकरीत्या उगवणारे, एक बहूपयोगी झाड आहे. याला लिंबाच्या रंगाची छोटी छोटी कडू चवीची फळे लागतात, म्हणून याचे नाव कडूलिंब. या झाडाची पाने, फळे, बिया, साल, मुळे सर्चव कडू असतात. याच्या अनेक उपयोगांमुळे हे सर्वांचे आवडते झाड आहे. कडू असल्यामुळे 'जंतुघ्न'हा याचा गुणधर्म पशु-पक्षी, पीक, मानव या सर्वांसाठी वापरला जातो. गुढीपाडव्याच्या शुभ दिवशी याची कोवळी पाने, फुले, लहान कोवळी फळे, जिरे, मिरे,सैन्धव मीठ, ओवा, गूळ, हिंग, चिंच हे सर्व एकत्र वाटून त्याची गोळी करून खातात.कडुलिंबाचे झाड मोठे म्हणजे सर्वसाधारणपणे आठ ते दहा मीटर उंच वाढते. याचे खोड सरळ वाढते; नंतर याला फांद्या फुटतात.या झाडाची साल काळी व खडबडीत असते. याची पाने हिरवी,मध्यम आकाराची व लांबट असतात. पानाच्या कडेने नक्षी असते. एका काडीला दहा ते बारा पाने येतात. पानाचा देठ बारीक असतो. चव कडू असते.

कढुलिंबाच्या झाडाची छाया थंड असते. त्या छायेतील घर उन्हाळ्यात थंड राहते.

असा हे लक्षात घेऊन त्यात अनेक ठिकाणीहे होतात

Similar questions