information about rabbit in marathi
plz it is in marathi but by mistake it is English
Answers
Answer:
ससा हा अतिशय गोंडस आणि सुंदर प्राणी आहे. ससा स्वभावाने भित्रा प्राणी आहे. सशाचे एकूण दोन प्रकार पडतात एक रानटी ससा आणि दूसरा पाळीव ससा. रानटी ससा हा रानामध्ये, जंगलामध्ये आढळतो. ससा हा सस्तन प्राणी आहे. ससा हा शाकाहारी प्राणी आहे. ससा हा कोवळे लुसलुशीत गवत खातो.ससा हा प्राणी भित्रा असल्यामुळे तो आपले प्राण वाचवण्यासाठी अतिशय वेगाने धावतो. ससा हा दाट झुडुपाच्या बुडक्यात राहतो. काही लोक ससा हा प्राणी आवडीने आपल्या घरामध्ये पाळतात. पांढर्या शुभ्र रंगाचा ससा शरीराने खूप आकर्षक आणि मोहक असतो. सशाचे शरीर मऊ असते. ससा अनेक प्रकारचे गवत, गाजर, मेथी, आणि कोवळी पाने हे सर्व अन्न खातो.आपल्या समाजामध्ये अनेक गैरसमज आहेत. असे म्हणतात कि ससा पाळण्याने घरामध्ये पैसा, सुख आणि समृद्धि येते आणि सर्व मानसिक त्रास नाहीसा होतो. सश्याच्या शरीराला स्पर्श केल्यावर एक कोमल, मखमली स्पर्शाचा अनुभव होतो इतके त्याचे शरीर मऊ आहे. ससा पाळण्यामागे प्रत्येकाचा वेगवेगळा हेतु आहे, कोणी ससा घरामध्ये शांतता यावी, समृद्धि यावी म्हणून ससा पाळतात तर कोणी ससा मांस उत्पादनासाठी पाळतात तर कोणी मनोरंजनासाठी ससे पाळतात.