World Languages, asked by pihu131339, 1 year ago

Information about S.P.I

In Marathi For essay writting ​

Answers

Answered by aayan0143
0

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत (एनडीए) प्रवेशासाठी तयारी करून घेणाऱ्या सैनिकी सेवापूर्व प्रशिक्षण संस्थेत (एसपीआय) प्रवेशासाठीची परीक्षा रविवारी घेण्यात आली. मराठवाड्यासह राज्यभरातून ३७१६ विद्यार्थी या परीक्षेसाठी बसले होते. दोन सत्रांत झालेल्या परीक्षेत कुठेही अडचण आली नाही. आता विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकालाची प्रतीक्षा आहे.

औरंगाबादेत राज्य सरकारची एसपीआय ही संस्था आहे. दहावीनंतर दोन वर्षे अकरावी, बारावीचे शिक्षण घेतानाच या संस्थेतून एनडीए प्रवेशाची तयारी करून घेतली जाते. प्रवेश परीक्षेद्वारे या केंद्रात प्रवेश निश्चित केले जातात. लष्करसेवेत जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही मोठी संधी असते. एसपीआय प्रवेशाची परीक्षा रविवारी औरंगाबादेत झाली. सिडको, हडकोतील ७ केंद्रांमध्ये रविवारी नऊ ते अकरा व साडेअकरा ते दुपारी एक या वेळेत ही परीक्षा झाली. परीक्षेसाठी ३ हजार ७१६ विद्यार्थी बसले होते. अगदी लष्करी शिस्तीत परीक्षा पार पडली. प्रत्येक केंद्राबाहेर चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. केंद्रामध्ये विद्यार्थ्यांना पिण्यासाठी पाण्याची सोय उपलब्ध करून दिली होती. वेळ संपल्यानंतर विद्यार्थी शिस्तीत परीक्षाकेंद्राबाहेर पडले. १००० विद्यार्थी एकेका केंद्रावर असूनही कुठेच गोंधळ पाहावयास मिळाला नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार; या परीक्षेचा निकाल संस्थेकडून आठवडाभरात ऑनलाइन पद्धतीने जाहीर होणार आहे.

पेपर चांगला चांगला. मी सुरवातीपासून लष्करात जाण्याचे निश्चित केले आहे. पालकांनीही त्यास प्रतिसाद दिला. परीक्षा केंद्रावर चांगली व्यवस्था होती.

- मानसिंग आंधळे

परीक्षा केंद्रावरील व्यवस्थेविषयी समाधानी आहे. लष्करात जाण्याचे उद्दिष्ट आहे. एसपीआयसाठी चांगली तयारी केली.

- स्वप्निल वैराळकर

आम्ही बुलडाण्याहून आलो. परीक्षेदरम्यानचा अनुभव चांगला आहे. मागच्यावर्षीपासूनच परीक्षेची तयारी सुरू केली.

- श्रेयस माडीवाले

केंद्र आवारात फक्त विद्यार्थ्याना प्रवेश होता, हॉल क्रमांक शोधण्यासाठी त्रास झाला नाही. चार ते पाच सूचना फलक होते, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होती.

- अभिषेक चापाईतकर

पालकांना गेटपर्यंतच प्रवेश होता. व्यवस्था वाखाखण्याजोगी होती. तपासणी व अन्य बाबी लष्करी शिस्तीला धरून होत्या. मेहनत घेतली आहे. यश मिळाल्यानंतर अधिक आनंद होईल.

- मनिषा आंधळे

चांगला अनुभव आला. मागच्या वर्षी आम्ही या संस्थेची माहिती घेऊन फॉर्म भरण्याची प्रक्रिया समजून घेतली होती. परीक्षेसाठी शनिवारीच औरंगाबादमध्ये आलो.

- संजय माडीवाले, बुलडाणा

एसपीआय प्रवेश परीक्षासाठी आम्ही बुलडाण्याहून आलो. शनिवारी रात्री पाहुण्यांकडे मुक्कामी आलो. परीक्षा केंद्रावर सकाळी पोहचण्यासाठी काही अडचण आली नाही. गर्दी खूप होती, पण व्यवस्था चांगली होती.

- संजय चापाईतकर, बुलडाणा

Similar questions