information about telephone in marathi
Answers
Answer:
u r worng b coz we ask for telephone information not for this
Explanation:
wtf
Answer:
एखादा निरोप एका ठिकाणावरुन दुसऱ्या ठिकाणी पोहोचवण्यासाठी आधीच्या काळी लोक खूप लांबचा प्रवास करायची.नंतर पत्राद्वारे संदेश पाठवले जायचे.पण यामुळे लोकांचा खूप वेळ वाया जायचा.तसेच कठीण प्रसंगात लोकांची फार पंचाईत व्हायची.
दूरध्वनीच्या आविष्काराने या सगळ्या समस्या दूर झाल्या.अलेक्जांडर ग्राहम बेल या वैज्ञानिकाने दूरध्वनीचा आविष्कार १८७६ मध्ये केला होता.दूरध्वनीचा आविष्कार हा मानवजातीसाठी खूप महत्वपूर्ण ठरला आहे.
दूरध्वनीमुळे आपण काही सेकंदातच जगातील बहुतांश लोकांशी संपर्क साधू शकतो.कोणताही महत्वाचा संदेश आपण दूरध्वनीमुळे लोकांपर्यंत लवकरात लवकर पोचवू शकतो.दूरध्वनीमुळे लोकांना ऑफिसचे कामसुद्धा करता येतात.आपल्याला अभ्यासात एखादी शंका आली, तर एखाद्या मित्राला फोन करून ती शंका आपण विचारू शकतो.प्रत्येक ठिकाणी दूरध्वनी उपयोगी ठरते.त्यामुळे वेळेची बचत होते.दूरध्वनीने जगाला जवळ आणले आहे.त्यामुळे आरामात आपण मित्रांशी व नातेवाईकांशी बोलू शकतो.
आधीच्या काळाचा दूरध्वनी आणि आताच्या दूरध्वनीमध्ये खूप बदल झाला आहे.आता तर, दूरध्वनीची जागा बऱ्याच ठिकाणी भ्रमणध्वनीने घेतली आहे.
तरीही जगातील दूरध्वनीचे योगदान विसरता येणार नाही.
Explanation: