India Languages, asked by fatemaa, 1 year ago

information on Savitri Bai Phule in marathi

Answers

Answered by VIDYAWRATJANWANI
1
savitri Bai phule hi Nathan krantikari hoti.aani tyani mulginsathi khup kaahi kele,mulgi Na shiksha VA vividha prakar che aadhikar tyani mistake.
Answered by Anonymous
18
"सावित्रीबाई फुले"

आज सर्वच क्षेत्रात पुरुषांबरोबर स्त्रियाही वावरताना दिसतात. याचे सर्व श्रेय सावित्रीबाई फुले यांनाच द्यावे लागेल. कारण मुलींना सर्वप्रथम 'श्रीगणेशा' शिकवणाऱ्या त्या पहिल्या भारतीय शिक्षिका होत.

सावित्रीबाई फुले ह्या महात्मा फुले यांच्या पत्नी. त्यांचा जन्म १८३१ साली, नायगाव येथे झाला आणि १८४० मध्ये, जोतीराव फुले यांच्याशी त्यांचे लग्न झाले. त्या काळात मुलींना शिक्षण दिले जात नसे. मुलींना शिक्षण दिले तर त्यांचे आयुष्य सुखाचे होईल, हे ओळखून महात्मा फुले यांनी मुलींची शाळा काढायचे ठरवले; पण त्या काळात मुलींना शिकवणारी शिक्षिकाच नव्हती.

तेव्हा सावित्रीबाईंनी प्रथम स्वतः आपल्या पतीकडून शिक्षण घेतले व मग मुलींना शिकविण्याचे कार्य सुरू केले. महात्मा फुले यांनी पुण्यात भिडे यांच्या वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली.

शाळेत मुलींना शिकवताना सावित्रीबाईंना लोकांनी खूप त्रास दिला; पण त्यांनी धैर्याने व शांतपणे सर्व संकटे सहन केली. शेवटी सावित्रीबाईंचाच विजय झाला व गौरवही झाला.

सावित्रीबाईंनी महात्मा फुले यांना समाजसुधारणेच्या कार्यात आयुष्यभर मदत केली. दीनदुबळ्यांची सेवा केली. दुःखितांची सेवा करता करताच त्यांना १८९७ साली मृत्यू आला. पण 'पहिल्या भारतीय शिक्षिका' म्हणून कीर्तीरूपाने त्या अमर झाल्या.
Similar questions