Information on shivaji maharaj in marathi.
speech
Answers
Answer:
सर्व प्रथम परम पवित्र माझ्या मातृभूमीला पहिल्यांदा नमस्कार,सन्माननीय व्यासपीठ, व्यासपीठावरील मान्यवर, वंदनीय गुरुजनवर्ग तसेच उपस्थित सर्व शिवभक्त रसिकहो. आज मी येथे अशा एका महान व्यक्ती बद्दल बोलणार आहे ज्याचा मला तुम्हालाच नाही तर संपूर्ण देशाला जगाला अभिमान आहे. ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय.
शिवाजी महाराज भाषण मराठी शायरी
शिवाजी महाराज भाषण मराठी शायरी
"सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला
भगवा टीका चंदनाचा शिवनेरी वर प्रगटला
हातात घेऊन तलवार शत्रू वर गरजला
महाराष्ट्रात असा एक राजा होऊन गेला"
19 फेब्रुवारी सोळाशे 30 हा सोन्याचा दिवस आणि अशा या मंगल दिनी महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात शिवनेरी किल्ल्यावर जिजाऊ माता यांच्या पोटी एका सिंहाचा जन्म झाला. आणि तो सिंह म्हणजे श्रीमंत श्रीमानयोगी, लोककल्याणकारी राजे, शासनकर्ते जाणते राजे शिवछत्रपती शिवाजी राजे भोसले होय.
शिवाजी महाराजांचा जन्म महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला म्हणून त्यांचे नाव शिवाजी असे ठेवण्यात आले. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले होते आणि आईचे नाव जिजाबाई हे होते.शिवाजी महाराजांनी वयाच्या पंधराव्या वर्षी स्वराज्याचे स्वप्न मनाशी बाळगले.रायरेश्वराच्या मंदिरातून जीवाला जीव देणाऱ्या मावळ्यांसोबत गुलामगिरी नष्ट करून स्वराज्याची स्थापना करण्याची शपथ घेतली.
स्वराज्याची निर्मिती करणे काही सोपी गोष्ट नव्हती. त्यावेळी सर्वत्र गुलामगिरी होती आणि समोर होते बलाढ्य शत्रू.त्यासाठी अनेक मावळ्यांनी आपले प्राण पणाला लावले होते. त्यामध्ये बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे, मुरारबाजी देशपांडे, नेताजी पालकर कोंडाजी फर्जद अशा अनेक शूर वीरांनी आपल्या शिवरायांची साथ दिली होती.
शिवरायांनी आपल्या चतुर आणि चाणश्य बुद्धीने आणि मावळ्यांच्या साथीने आपल्या समोरील बलाढ्य शत्रूला म्हणजेच अफजल खान, औरंगजेब, शाहिस्तेखान अशा अनेक शत्रूला धुळ्यात पाडले म्हणजे त्यांना हरवून टाकले.आणि जिजाऊ मातेने पाहिलेले स्वराज्याचे स्वप्न त्यांनी सत्यात उतरविले.छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक गड जिंकले व शत्रुंचा नाश करुन हजारो वर्षांची गुलामगिरी नष्ट संपूर्ण स्वराज्याची स्थापना केली आणि एवढे दिवस अंधारात असलेल्या रयतेला प्रकाशात आणीले.
6 जून 1674 रोजी आपल्या राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक करण्यात आला. आणि सुमारेसाडे तीनशे वर्षे गुलामगिरीत पडलेल्या,जुलमी शासन कर्त्याच्या अन्यायाला ग्रासलेल्या, अत्याचाराने त्रासलेल्या, गोरगरीब रयतेला लोककल्याणकारी, न्यायप्रिय असा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रुपाने मिळाला.