Hindi, asked by ramakantbhangale4545, 11 months ago

information on water in marathi

Answers

Answered by pranitkhandekar8
0

Explanation:

पाणी (H2O) हे हायड्रोजन व ऑक्सिजन या अणूंपासून बनलेला द्रव पदार्थ आहे. हायड्रोजन वायूचे दोन अणू आणि प्राणवायूचा (ऑक्सिजन) एक अणू यांचा संयोग होऊन पाण्याचा एक रेणू तयार होतो. सामान्य तापमानाला पाणी द्रव अवस्थेत असते. या द्रवरूपात ते निसर्गात विपुल प्रमाणात आढळते. पाणी रंगहीन, गंधहीन असून त्याला स्वतःची चव नसते. ते प्राणी-वनस्पतींच्या सर्व जैविक प्रक्रियेत आवश्यक असते. त्यांच्या घन रूपाला बर्फ व वायुरूपाला वाफ म्हणतात. पाणी एका रूपातून दुसऱ्या रूपात म्हणजे द्रव रूपातून वायुरूपात म्हणजे वाफेत रूपांतरित होते. त्या वाफेला थंडी लागताच त्यांचे रूपांतर द्रवरूपात म्हणजे पाण्यात होते. तसेच बर्फाला उष्णता दिली की त्याचे पाणी होते आणि पाणी फार फार थंड केले की त्याचा बर्फ बनतो. अनेक पदार्थ पाण्यात विरघळतात व म्हणून पाण्याला वैश्विक द्रावक (Universal solvent) असे म्हणतात. पाणी एका जागी स्थिर झाल्यास गुरुत्वाकर्षणामुळे त्यातले पाण्याहून जड असलेले कण तळाशी साठत जातात आणि हलके कण वर येऊन तरंगतात. या दोन्हींच्या मधले पाणी स्वच्छ होत जाते. शहरांच्या पाणीपुरवठा केंद्रांमध्ये या गुणधर्माचा उपयोग करून पाणी स्वच्छ केले जाते. आपल्या शरीरात ६० ते ७०% पाणी असते. निरोगी आरोग्यासाठी ते तितके असणे चांगले असते, म्हणूनच पाण्याला जीवन म्हणतात.

Similar questions