internet one gift speech in marathi
Answers
Answer:
इंटरनेटचा वापर व्यसन की गरज?
एकविसाव्या शतकातल्या जीवनशैलीचं वैशिष्ट्य म्हणजे इंटरनेटचा सर्व क्षेत्रात वाढलेला वापर. एकमेकांशी संपर्क साधणं, माहिती गोळा करणं आणि माहिती साठवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या संगणकीय मायाजालाची मोहिनी, आज प्रत्येकाच्या आयुष्याच्या कानाकोपऱ्यात पसरली आहे.
एकविसाव्या शतकातल्या जीवनशैलीचं वैशिष्ट्य म्हणजे इंटरनेटचा सर्व क्षेत्रात वाढलेला वापर. एकमेकांशी संपर्क साधणं, माहिती गोळा करणं आणि माहिती साठवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या संगणकीय मायाजालाची मोहिनी, आज प्रत्येकाच्या आयुष्याच्या कानाकोपऱ्यात पसरली आहे.
संपर्कासाठी पत्रव्यवहाराऐवजी ई-मेल, व्हॉट्सअॅप, फेसबुकसारखे सोशल मीडिया, बातम्यांसाठी वर्तमानपत्रं वाचण्याऐवजी गुगल न्यूज, याहू न्यूज, अॅपल न्यूज, ट्विटरसारखी अॅप्लिकेशन्स वापरण्याकडे कल वाढत चालला आहे. एकूण एक वर्तमानपत्रं; तसंच टेलिव्हिजन न्यूज चॅनेल्स आज इंटरनेट आणि मोबाइल अॅप्सद्वारे बातम्या तत्क्षणी प्रसारित करत असतात.पुस्तकं, कपडे, फर्निचर, औषधं, खाद्यपदार्थ किंवा कुठलीही एखादी वस्तू खरेदी करायची असेल, तरी ती इंटरनेट, मोबाइलद्वारे मिळू शकते. बँकेचे व्यवहार असोत, इन्कमटॅक्स, सेल्सटॅक्स भरायचा असो, रेल्वेचा किंवा विमानाचा प्रवासच नाही, तर गावातल्या गावात कुठेही जायचं असो, सगळ्यांसाठी आज इंटरनेट वापरावंच लागतं.इंटरनेट ही आता चैन राहिली नसून, काळाची गरज होऊन बसली आहे. एके काळी सतत नेट वापरणाऱ्यांना नेटसॅव्ही म्हटलं जायचं. एखादी व्यक्ती सतत ऑनलाइन असणं ही प्रतिष्ठेची बाब समजली जायची; पण आज घरकाम करणाऱ्या अशिक्षित मोलकरणीदेखील त्यांच्या रोजच्या कामांसाठी सफाईने मोबाइल वापरतात.
इंटरनेट सातत्याने वापरणं एक व्यसन आहे, असं मत १९९० साली काही मानसरोगतज्ज्ञांनी मांडलं. मात्र, जागतिक मानसरोगांच्या यादीत तंत्रज्ञानांच्या आहारी जाणं ही विकृती मानायला अनेकांचा विरोध होता. युरोप-अमेरिकेमध्ये यावर दोन्ही बाजूंनी मतं मांडली जातात; पण भारत, चीन, तैवान, दक्षिण कोरिया, सिंगापूर या पौर्वात्य देशांमध्ये इंटरनेट आणि मोबाइलचं जाळं विस्मयजनकरित्या विस्तृत आहे