इरेक्टस म्हणजे कोण उभा रहाणारा माणुस
Answers
Answered by
4
Answer:
स्तनी वर्गातील नरवानर गणात आधुनिक मानवाचा समावेश होतो. नरवानर गणातील आता अस्तित्वात नसलेल्या पूर्वजांपासून आधुनिक मानवाची उत्क्रांती झाली आहे. मानवाच्या उत्क्रांतीच्या या दीर्घ प्रक्रियेला सु. ६० लाख वर्षांचा कालावधी लागलेला आहे. दोन पायांवर उभे राहून चालणे – हे मानवाचे वैशिष्ट्यपूर्ण लक्षण मानले जाते आणि सु. ४० लाख वर्षांपूर्वी मानवामध्ये ते लक्षण उत्क्रांत झाले. त्यानंतर, आकारमानाने व गुंतागुंतीची संरचना असलेला मेंदू, अवजारांची निर्मिती व वापर, भाषेची क्षमता इ. इतर मानवी वैशिष्ट्ये विकसित झाली. यांखेरीज जटिल सांकेतिक अभिव्यक्ती, कला आणि सांस्कृतिक विविधता इ. प्रगत वैशिष्ट्ये मागील एक लाख वर्षांत विकसित झालेली आहेत
Similar questions