इरेक्टस म्हणजे ताठ उभा राहणारा मापस
Answers
Answer:
इरेटॉस्थेनस : (इसवीसन पूर्व २७६ – १९४)
इरेटॉस्थेनस यांचा जन्म ग्रीसमधल्या सिरेनी (Cyrene) येथे झाला. प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यावर पुढच्या शिक्षणासाठी ते ॲथेन्स येथे गेले. तिथे त्यांनी झेनो (Zeno), ॲरिस्टोन (Ariston), प्लेटोनिक ॲकेडमीचा प्रमुख आरसेसिलस (Arcesilaus) या सर्वांकडून तत्त्वज्ञानाचे शिक्षण घेतले. शिकत असतानाच त्यांनी प्लेटोच्या तत्त्वज्ञानाच्या गणिती पायाचे विवेचन करणारे प्लेटोनिकॉस (‘Platonikos’) हे आपले पहिले लिखाण केले. इरेटॉस्थेनस हे तरल प्रतिमेचे कवी सुद्धा होते. हरमेस (‘Hermes’) आणि इरिगोने (‘Erigone’) ही दोन दीर्घकाव्ये त्यांनी लिहिली. इसवीसनपूर्व २४५ मध्ये त्यांना अलेक्झेंड्रियाच्या (Alexandria) ग्रंथालयाचे उप-ग्रंथपाल हे पद देण्यात आले. हे पद स्वीकारून वयाच्या ३०व्या वर्षी इरेटॉस्थेनस अलेक्झेंड्रिया इथे स्थायिक झाले. उर्वरित सर्व आयुष्य त्यांनी तिथेच व्यतीत केले. पाचच वर्षात ते अलेक्झेंड्रिया ग्रंथालयाचे प्रमुख ग्रंथपाल बनले. ग्रंथालयाचा विस्तार करण्यासाठी त्यांनी अपार कष्ट घेतले.
पृथ्वीचा परिघ मोजण्यासाठी इरेटॉस्थेनस यांनी वापरलेली पद्धत त्यांच्या गणिती बुद्धिमत्तेची आणि कल्पकतेची साक्ष देते. उन्हाळ्यातल्या सर्वांत मोठ्या दिवशी इजिप्तमधल्या सिएने (Syene) इथे दुपारी एका विहिरीत सूर्याचे प्रतिबिंब थेट पाण्यात दिसते ही माहिती त्यांना कळली. याचा अर्थ त्यावेळी सूर्यकिरण सिएने येथे लंबरूप असतात हे इरेटॉस्थेनस यांनी ओळखले. त्याच दिवशी दुपारी अलेक्झेंड्रिया इथे सूर्यकिरणाचा एका खांबाशी होणारा पतनकोन त्यांनी मोजला. तो पूर्ण वर्तुळाच्या ५० व्या भागाइतका भरला. सूर्यकिरण एकमेकांना समांतर असतात आणि पृथ्वी गोल आहे असे मानून भूमितीचे नियम वापरून किरणांचा अलेक्झेंड्रियातील खांबाशी होणारा कोन आणि सिएने येथील विहीर व अलेक्झेंड्रियातील खांब या दोन ठिकाणांना पृथ्वीमध्याशी जोडणाऱ्या त्रिज्यांमधला कोन हा सारखाच असला पाहिजे हे त्यांनी प्रतिपादित केले. सिएने आणि अलेक्झेंड्रिया यातले अंतर ५,००० स्टेडिया (stadia) होते. पूर्ण वर्तुळाच्या ५०व्या हिश्श्यात परिघावर समावलेले अंतर ५,००० स्टेडिया असेल तर संपूर्ण परीघ ५०×५०००=२५०,००० स्टेडिया असणार असे गणित इरेटॉस्थेनस यांनी मांडले. या गणिताची अचूकता अर्थातच एक स्टेडियम (stadium) म्हणजे किती किलोमीटर या सूत्रावर अवलंबून आहे. या सूत्राबद्दल तज्ज्ञांमध्ये थोडी मतभिन्नता आहे, पण तज्ज्ञांनी सुचवलेला कुठलाही अंदाज मान्य केला तरी इरटॉस्थेनस यांनी मांडलेली किंमत ही आज माहित असलेल्या पृथ्वीच्या परिघाच्या अचूक किंमतीच्या बरीच जवळ जाणारी आहे.