इतिहासाची भौतिक साधने नावे सांगा
Answers
इतिहासाचे लेखन आणि अभ्यास हा भूतकाळासंबंधी माहिती देऊ शकणाऱ्या विविध साधनांवर अवलंबून असतो. भूतकाळाविषयीची माहिती ज्यातून मिळू शकते अशा साधनांना इतिहासाच्या अभ्यासाची साधने म्हणता येते. भूतकाळाविषयी माहिती देणारी अशी साधने विविध स्वरूपाची असतात. त्यांचे वर्गीकरण विविध निकष लावून करण्यात येते. भूतकाळात घडलेल्या घटनांची कालक्रमानुसार शास्त्रशुद्ध आणि पद्धतशीर दिलेली माहिती म्हणजे इतिहास होय व्यक्ती समाज स्थळ आणि काळ हे चार घटक इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. इतिहास हा विश्वसनीय पुराव्यांवर आधारित असतो या पुराव्यांना इतिहासाची साधने असे म्हणतात.
Answer:
भौतिक साधने :- इतिहासाच्या लिखित साधनांनंतर आपण आता भौतिक साधनाची माहिती घेऊ. नाणी, प्रार्थना स्थळे, दैनंदिन वापरातील वस्तू, राजमुद्रा, अलंकार, संग्रहालय, पेहराव, आधुनिक स्थापत्य या सर्व साधनांचा समावेश भौतिक साधनांत होतो. या साधनांशिवाय स्तंभ, विहार, स्तूप, नगरे, कोरीव काम, लेणी यांचाही भौतिक साधनांमध्ये समावेश होतो.