इतिहासाचे जतन व्हावे यासाठी किमान पाच उपाय सुचवा. इन मराठी
Answers
Answer:
Answer:
इतिहासाच्या साधनांत लिखित साधने, भौतिक साधने आणि मौखिक साधने यांचा समावेश होतो. या साधनांचे वेगवेगळ्या पद्धतीने जतन करावे लागते.
Explanation:
१) लिखित साधनांचे जतन :
१. प्राचीन ग्रंथ, पुस्तके, ऐतिहासिक दस्तऐवज यांचे जतन करावे लागते. त्यांची पाने बुरशी, किंवा पाण्यापासून वाचवावी लागतात.
२. या साधनांना पाणी लागणार नाही याची काळजी घ्यावी लागते.
३. कीटकनाशक औषधे वापरावी लागतात.
२) भौतिक साधनांचे जतन :
१. किल्ले, स्मारके, राजवाडे ही भौतिक साधने आहेत.
२. अशा ऐतिहासिक वास्तूंची पाहणी केली पाहिजे. त्यांचे संरक्षण केले पाहिजे.
३. वास्तूंची नासधूस होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे.
४. वास्तूवर कोणीही आपले नाव किंवा अन्य माहिती लिहिली किंवा कोरली नाही पाहिजे.
५. ऐतिहासिक नाणी, प्राचीन हत्यारे अशा विविध वस्तू काळजीपूर्वक हाताळाव्यात. त्यांची चोरी होणार नाही याची काळजी घ्यावी.
३) मौखिक साधनांचे जतन :
१. ओव्या, लोकगीते, गोष्टी इत्यादी मौखिक साधने असतात.
२. अशा साधनांचे संकलन केले पाहिजे.
३. हे मौखिक साहित्य जतन करण्यासाठी ते लिखित स्वरूपात आणावे.
४. मौखिक साहित्य एक पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पाठवावे.
Explanation: