इतिहास लेखनात मौखिक संसाधने कशी उपयोगी पडतात
Answers
Answer:
मौखिक साधने लिखित केली jatat
Answer:
भारतीय इतिहासाची तीन प्रकार पडतात.
प्राचीन भारताचा इतिहास, मध्ययुगीन भारताचा इतिहास, आधुनिक भारताचा इतिहास या तीनही कालखंडात पूर्वजांनी कोणती संसाधने वापरली त्याचा उपयोग कसा केला, या सर्व गोष्टींचा अभ्यास केल्यानंतर लक्षात येते पूर्वजांनी कोणती साधने वापरली . त्यांचे राहणीमान, जीवनशैली, चालीरीती, परंपरा, लोककला, लोकसाहित्य या गोष्टींची ओळख आपल्याला होते.
इतिहासाच्या साधनांचे तीन प्रकार आहेत.
भौतिक साधने, लिखित साधने व मौखिक साधने.
प्रत्येक प्रत्येक प्रकारांमध्ये त्याकाळातील साधने कोणती होती हे दाखवलेले आहे.
त्यापैकी मौखिक साधने ही ना कुठे लिहिली गेली ना कुणी तयार केली आहे. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे तोंडी स्वरूपात शिकवले व पाठ करून घेतले हा एकच पुरावा या साधनांमध्ये आहे.
प्राचीन काळापासून चालत आलेली ही परंपरा आजही आपण आजमावत आहोत. मंदिरात बरेचदा ओव्या भजने भारुडे गायिली जातात.
अश्मयुगीन व मध्ययुगीन इतिहासात ओव्या, लोकगीते, लोककला, अनेक धर्मांच्या रूढी, परंपरा, बुद्ध व जैन साहित्य, चालीरीती, ही साधने मौखिक साधने म्हणून ओळखली जातात. आधुनिक काळात मानवाला सर्व कला अवगत झाल्यामुळे आधुनिक काळातील साधनांमध्ये पोवाडे, दृकश्राव्य साधने, स्फूर्तीगीते, छायाचित्रे, चित्रपट व ध्वनीमुद्रिते यांसारखी आधुनिक साधनेही उपयुक्त ठरतात.