इतिहास म्हणजे काय???????????
Answers
Answer:
इतिहास :
इतिहासाची अधिकात अधिक वस्तुनिष्ठ अशी व्याख्या करायची, तर इतिहास ह्या संस्कृत शब्दाचा व्युत्पत्तिसिद्ध जो अर्थ आहे, तोच स्वयंपूर्ण आणि प्रमाण मानावा लागेल. ‘इति + ह् + आस’ म्हणजे ‘असे झाले’, ‘याप्रमाणे घडले’. ह्यात सर्व घडलेल्या गोष्टी आल्या आणि अर्थात त्या घडल्या तशाच सांगितल्या गेल्या, हेही इथे अभिप्रेत आहे. जे घडले ते सर्वच्या सर्व इतिहासाच्या कक्षेत न घेतल्यामुळे इतिहास म्हणजे भूतकालीन राजकारण, अशा प्रकारच्या संकुचित व्याख्या निर्माण होतात. एखाद्या कालखंडाचा इतिहास म्हणजे त्या काळातील मानवी जीवनाच्या सर्व अंगांचा आढावा, असाच अर्थ झाला पाहिजे. आवश्यकतेप्रमाणे घटनांची निवड करता येते,केलीही जाते मात्र अशा वेळी आपण ज्याचा आढावा घेत अहोत, तो भूतकालीन जीवनाचा केवळ एक भाग आहे, ह्याची स्पष्ट जाणीव ठेवावी लागते.
Answer:
इतिहास म्हणजे भुतकाळातील घटनांची नोंद व ज्ञान होय.