History, asked by jayrajmedicals, 1 month ago

इतिहास विषयाचा अभ्यास करण्यासाठी आपण कोणती साधने वापरतो?​

Answers

Answered by rajraaz85
0

Answer:

इतिहासातील भूतकाळातील गोष्टींचा अभ्यास करत असताना, मौखिक साधने, लिखित साधने व भौतिक साधनांचा वापर केला जातो.

इतिहासातील साधनांचे वेगवेगळ्या गटात वर्गीकरण केले जाते. जसे, मौखिक साधनांमध्ये भारुडे, कथा, लोकगीते, ओव्या या गोष्टींचा समावेश केला जातो.

लिखित साधनांमध्ये - शिलालेख, ताम्रपत्र, भिंतीवर लिहिलेले लेख, झाडांच्या साली, भांडी व कच्चा विटांवर केलेले काम या सर्व गोष्टींचा अभ्यास लिखित साधनांमध्ये करतात. धातु, दगडांची हत्यारे व भांडी, पुरातन वास्तू, पुरातन अवशेष या गोष्टींचा अभ्यास भौतिक साधनांमध्ये करतात. ही सर्व साधने इतिहासाचा अभ्यास करत असताना उपयुक्त ठरतात.

Similar questions