Hindi, asked by adityagalade, 2 months ago

२) इतिहासलेखन म्हणजे काय?​

Answers

Answered by bamanedhanashree123
1

Answer:

इतिहासलेखन म्हणजे काय ? (२५ ते ३० शब्दांत उत्तरे लिहा.)

उत्तर:- इतिहास लेखन म्हणजे काय हे खालील मुद्यांवरून स्पष्ट करता येईल.  

इतिहास लेखन म्हणजे वेळोवेळी मिळालेल्या पुराव्यांचे संशोधन करून भूतकाळातील घटनांची मांडणी व्यवस्तिथरित्या करणे होय. प्राचीन काळात इतिहासलेखनाची परंपरा जगभर नव्हती. इतिहासकाराला वाचकांपर्यंत जे पोहोचवायचे आहे त्याप्रमाणे तो भूतकाळातील घटनांची निवड करीत असतो. उपलब्ध ऐतिहासिक माहितीचे संकलन करणे व विशलेषण करणे. उपलब्ध माहितीचे संशोधन करणे तसेच त्याच्याशी निगडित संदर्भ शोधून काढणे. स्थळ, काळ, वेळ या सर्व गोष्टींची विस्तृत माहिती संदर्भासहित गोळा करणे. मिळालेल्या माहितीच्या संदर्भात योग्य त्या प्रश्नांची मांडणी करणे. भूतकालीन स्मृतींचे जतन करणे, मोठ्यांकडून/वडिलधाऱ्यांकडून ऐकलेल्या पूर्वजांच्या पराक्रमांच्या गोष्टी, कथा, गीते व पोवाडे, गुहाचित्रे यांद्वारे स्मृतींचे जतन केले जात असे. आधुनिक इतिहासलेखनात याच गोष्टी इतिहासाची साधने झाली होती. इतिहासकाराने निवडलेल्या घटना आणि त्याचा वैचारिक दृष्टीकोन यांवर त्याची लेखनशैली निश्चित होत असते. या पद्धतीने केलेल्या लेखनपद्धतीला 'इतिहासलेखन' असे म्हणतात.

Explanation:

MARK ME AS BRAINLIEST

Answered by arpitarokade69
3

Answer:

इतिहासात उपलब्ध पुराव्यांचे चिकित्सापूर्वक संशोधन करून, भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची मांडणी कशी केली जाते, हे आपण पाहिले. अशी मांडणी करण्याच्या लेखनपद्धतीला इतिहासलेखन असे म्हणतात.

I Hope It you......like me

Similar questions