Music, asked by bhorprasad43, 2 months ago

इतिवृत्त म्हणजे काय सांगून प्रकार लिहा​

Answers

Answered by gajananrav57
1

Answer:

hope it help you like how I help you by answering this question now it's your turn to help me by marking my answer as brainliest answer please I need your help so please do it.

Explanation:

इतिवृत्त : (क्रॉनिकल). महत्त्वपूर्ण प्राकृतिक व ऐतिहासिक घटनांची कालक्रमानुसार केलेली नोंदणी. इतिहासलेखन आणि इतिवृत्त यांची आधारसामग्री एकच असली, तरी या दोन लेखनप्रकारांत फरक आहे. इतिवृत्ते जुन्या काळात निर्माण झाली असून त्यांत मुख्यतः सर्वसाधारण वाचकांसाठी सरळ व वस्तुनिष्ठ भूमिकेवरून रचनाकाराला ठळक ठळक वाटणाऱ्या घटना कालनिर्देशासह संकलित केलेल्या असतात. म्हणूनच इतिवृत्ते इतिहासाच्या सांगाड्यासारखी असून त्यांत भाष्य किंवा मीमांसा यांचा प्रायः अभाव असतो. इतिहासलेखन ही एक इतिवृत्ताचीच परिणत अवस्था म्हणावयास हरकत नाही. त्यात घटनांच्या नोंदीशिवाय त्यांवरील भाष्य किंवा मीमांसाही केलेली आढळते. तथापि इतिवृत्तांना विशिष्ट प्रकारचे महत्त्व लाभलेले असते. विशेषतः मूळची कागदपत्रे उपलब्ध नसतील, तर इतिवृत्तांतील मजकूर तात्पुरता ग्राह्य मानण्यात येतो.

प्राचीन काळी प्रतिवार्षिक वृत्तांत असलेली इतिवृत्ते तयार करीत असत. चीनमधील वासंतिक किंवा शारदीय इतिवृत्ते किंवा रोममधील अधिकाऱ्यांची नावे तथा गतवर्षीय घटनांची नोंद असलेली ॲनल्स मॅझिमी ही प्रतिवार्षिक इतिवृत्तेच होत. याच धर्तीवर ईजिप्शियन, ॲसिरियन, बॅबिलोनियन, फिनिशियन यांसारख्या प्राचीन संस्कृतींत पंचांगे, राज्यारोहण-दिन अथवा महत्त्वाचे वर्धापनदिन यासंबंधीच्या याद्या, वंशावळी इ. तयार केलेली आढळतात. त्यांतच त्यांनी प्रसंगोपात्त घडलेल्या असाधारण व अद्‌भुतरम्य घटनांचीही नोंद करून ठेवलेली आहे. अशी इतिवृत्ते बहुधा प्रतिवर्षी तयार करण्यात येत असत. बायबलमधील जुन्या कराराचे दोन भाग म्हणजे इतिवृत्तेच असून हिब्रू भाषेत ते एकत्र केलेले आहेत. त्यांत वंशावळी, डेव्हिड व सॉलोमन यांच्या कारकीर्दीचा आणि ज्युडाच्या राज्याचा इतिहास असे तीन विभाग आढळतात. हिब्रू भाषेतील अशाच एका इव्हेंट्स ऑफ द टाइम या नावाच्या इतिवृत्ताचे सेंट जेरोमीने लॅटिनमध्ये भाषांतर केले असून त्याला त्याने प्रथमतःच क्रोनिकॉन हे नाव दिलेले आढळते. सेंट जेरोमीचे प्रस्तुत भाषांतरच पुढील इतिवृत्तलेखकांना आदर्शभूत ठरले. बाराव्या शतकानंतर यूरोपीय प्रबोधनकाळाच्या आसपास इतिवृत्तलेखन सर्व यूरोपीय भाषांतून होऊ लागले. मठवासीयांप्रमाणेच सामान्य लोकांनीही हा लेखनप्रकार हाताळल्याचे दिसून येते. इतिवृत्तांची रचना गद्याप्रमाणेच पद्यांतूनही केली जाई. क्रॉनिकल ऑफ द मोरीया हे इतिवृत्त कोण्यातरी अज्ञात इसमाने चौदाव्या शतकात लिहिले असून त्यात ग्रीक पद्ये आढळतात. या इतिवृत्ताची फ्रेंच, इटालियन इ. भाषांत भाषांतरेही झालेली आहेत.

इतिवृत्तलेखक बहुधा आपल्या आधारसामग्रीचा निर्देश करीत नाहीत. परंपरेने चालत आलेल्या आख्यायिकांचाच व पुष्कळदा ऐकीव माहितीचा ते आपल्या लेखनात उपयोग करून घेतात. असे करताना त्या त्या घटनांमागील सत्यासत्याची शहानिशा ते करीत नाहीत. तसेच तत्कालीन घटनांची महत्त्वसापेक्षतेनुसार निवड न करता प्रमुख घटनांच्या वर्णनात निरर्थक, विक्षिप्त व गौण घटनांचीही पूर्णपणे सरमिसळ करून टाकतात.

इतिवृत्तांत शैलीदृष्ट्या कृत्रिमतेचा पूर्णपणे अभाव असतो. ती वाङ्‌मयीन दृष्टीनेही मनोरंजक व आकर्षक ठरतात. भारतात अशी इतिवृत्ते झाली आहेत. ⇨ कल्हणाची राजतरंगिणी अंशतः इतिवृत्तच आहे. मुसलमानी व मराठी काळांत बरीच इतिवृत्ते तयार झाली. हफ्तकुर्सी, मआसिर-इ-आलमगीरी, दिल्ली क्रॉनिकल, जेधे व शिवकालीन इतर शकावल्या, पंतप्रधान यांच्या दोन शकावल्या इ. याच सदरात मोडतात.

Answered by Mithalesh1602398
0

Answer:

इतिवृत्त हा एक प्रकारचा लेखन असतो ज्यामध्ये कोणत्याही घटनेचे ज्यामुळे होणारे परिणाम, त्याचे परिणाम असलेल्या अस्तित्वाचे काही वर्णन करण्यात येतात. याचा उदाहरण एका व्यक्तिच्या जीवनात होणारी एक विशेष वाटचाली असू शकते.

Explanation:

इतिवृत्त हे एक लेखनात्मक प्रकार आहे ज्यात व्यक्तीच्या जीवनाचे घटनेचे वर्णन केले जातात. इतिवृत्त असलेल्या लेखाची शैली सामान्यतः लघुकथा, गोष्ट आणि जीवनी या प्रकारची असते. इतिवृत्त लेखनात्मक रूपात लिहिला जातो आणि एकाहून अधिक पात्रांच्या जीवनाच्या घटनांचा वर्णन केला जातो. या लेखात व्यक्तीच्या जीवनाच्या महत्वाच्या क्षणांची संक्षिप्त आणि विस्तृत ओळख केली जाते. इतिवृत्ताचा उद्देश वाचकांना एक निश्चित आशय देणे आहे ज्यामुळे वाचक त्याच्या जीवनाबद्दल जाणून घेण्यासाठी उत्तेजित होते.

इतिवृत्तातील साहित्यिक घटना कायमच्या अस्तित्वावर आधारित असते. त्यामुळे इतिहास, उत्सव, आंदोलन आणि इतर समाजाच्या आयामांवर असलेल्या घटनांचा संग्रह असतो. इतिवृत्तातील घटना फक्त संग्रहीत करणे म्हणजे ती घटना सारखी घटना असणार नाही, तर काही तरी कथनात्मक प्रवृत्ती असणार असे असू शकते.

To learn more about similar questions visit:

https://brainly.in/question/51779018?referrer=searchResults

https://brainly.in/question/12859891?referrer=searchResults

#SPJ3

Similar questions