इतरांना देण्यासाठी कोणती गोष्ट तुल्याजवळ आहे
Answers
Answer:
वर्गकार्य
१. काय ते लिहा :
(१) दवबिंदूंचे पडतात-सडे
(२) फुले आनंदाने उधळतात-सुगंध
२. कसे ते लिहा :
(१) फुलांकडे जावे-हळूच
(२) फुलांचे हृदय -इवलेसे
३.कोठे ते लिहा
१)फुले लपून बसतात ते ठिकाण- पानांच्या आड -
२) तऱ्हेतऱ्हेचे रंग- फुलांच्या अंगांवर
४.तर काय झाले असते?
वारा सुटला नसता तर....
उत्तर-फुले डोलली नसती व गंध वातावरणात पसरला नसता.
*५. एका वाक्यात उत्तरे लिहा :
(१) इतरांना देण्यासाठी कोणती गोष्ट तुमच्याजवळ आहे ?
नमुना उत्तर : इतरांना देण्यासाठी माझ्याकडे प्रेम आहे.
(२) फुलाप्रमाणे आणखी कोणाचा सुगंध सगळीकडे पसरतो ?
उत्तर : फुलाप्रमाणे अगरबत्ती, धूप, अत्तर यांचा सुगंध सगळीकडे पसरतो.
(३) फुलाप्रमाणे आणखी कोणाचे मन निर्मळ व सुंदर असते?
उत्तर : फुलाप्रमाणे आईचे, संतांचे व लहान बालकांचे मन निर्मळ व सुंदर असते.
(४) तुम्हांला कोणत्या फुलांचा रंग व वास आवडतो?
नमुना उत्तर : मला चाफा, गुलाब व मोगरा या फुलांचा रंग व वास आवडतो.