Science, asked by sanjanakadam403, 5 hours ago

iv) सत्य की असत्य ते लिहा.
निर्वात पोकळीत सर्व वारंवारतेच्या प्रकाश लहरींचा वेग
सारखाच असतो.​

Answers

Answered by amrutaphadtare2006
0

Answer:

प्रकाशाचा वेग हा एक वैश्विक स्थिरांक असून त्याला भौतिकशास्त्राच्या अनेक शाखांमध्ये महत्त्व आहे. हा c या आद्याक्षराने दर्शवला जातो व त्याचे अचूक मूल्य २९,९७,९२,४५८ मीटर प्रति सेकंद एवढे आहे. प्रकाशाच्या गतीनुसारच मीटर व सेकंद ही एकके ठरवलेली असल्याने वरील अचूक मूल्य मिळते. विशेष सापेक्षतेनुसार विश्वातील सर्व पदार्थ व माहितीचा सर्वाधिक वेग c आहे तसेच सर्व वस्तुमानहीन कण तसेच सर्व क्षेत्रांमध्ये (उदा. विद्युच्चुंबकीय, गुरुत्वीय, इ.) झालेल्या बदलांच्या प्रसाराचाही हाच वेग असतो. असे कण व लहरी स्रोताच्या गतीचा व निरीक्षकाच्या जडत्वीय संदर्भचौकटीची पर्वा न करता नेहमी c याच वेगाने प्रवास करतात. सापेक्षतावादाच्या सिद्धान्तामध्ये काल-अवकाश परस्परसंबंध दर्शविण्यासाठी तसेच वस्तुमान-ऊर्जा समतुल्यतेच्या E=mc2 या प्रसिद्ध सूत्रात c चा आधार घेतला जातो.

पाणी व हवा यांसारख्या पारदर्शक पदार्थांमधून जाताना असलेला प्रकाशाचा वेग हा c पेक्षा कमी असतो. तसेच संदेशतारांमधून जात असतानाही रेडिओ लहरींचा वेग c पेक्षा कमी असतो. या वेगाला जर v मानले तर येणार्‍या c/v या गुणोत्तरास अपवर्तनांक असे म्हणतात. उदा. काचेचा दृश्यप्रकाशासाठीच्या अपवर्तनांकाचे मूल्य १.५ च्या जवळ आहे. याचा अर्थ प्रकाश हा काचेतून c / १.५ ≈ २,००,००० किलोमीटर प्रतिसेकंद या वेगाने प्रवास करतो. हवेचा अपवर्तनांक १.०००३ आहे म्हणून प्रकाशाची हवेतील गती २,९९,७०० किमी/सेकंद आहे (c पेक्षा ९० किमी/से. ने कमी). मैलांमध्ये प्रकाशाचा वेग सेकंदाला १,८६,२८२ (सुमारे १,८६,०००) मैल आहे.

Similar questions