इयत्ता 8 वी :- मराठी
● मुद्याच्या आधारे कथा लिहा.
लोभी माणूस....तपश्चर्या....परमेश्वर प्रसन्न....वरदान....सूर्य मावळेपर्यंत पळून येशील तितकी जमीन तुझी.... पळतच राहतो....सूर्यास्त होतो.... शेवटी थकून मरून पडतो.... अतिलोभाचे फळ.
Answers
Answer:
hey mate ! here's your answer
Explanation:
एका लोभी माणसावर देव प्रसन्न झाला आणि म्हणाला ‘सकाळ संध्याकाळ पर्यंत जितक्या जमीनीवर तुझी पावूले पडतील तितकी जमीण तुझी होईल. आता तुला किती जमीन हवी हे तू ठरवायच आणि त्या प्रमाणे प्रयत्न करायचा’ माणूस लोभीतर होताच शिवाय लोभामुळे विचार क्षमता ही गमावून बसला होता. म्हणूनच देवाच्या बोलण्याचा आशयही समजू शकला नाही. त्याने विचार केला कि चालत राहिलो तर अशी कितीशी जमीन त्याब्यात येणार त्या पेक्षा पळत निघालो तर जास्ती जास्त जमीन आपल्याला मिळवता येइल. बस ठरल पळायच.
त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी सूर्योदया पासून त्याने पळण्यास प्रारंभ केला. पळता पळता दुपार झाली. भूक लागली. पण थांबलो तर आपलच नुकसान आहे.
तहान भूक तर काय रोजचीच आहे. अशी संधी परत थोडी मिळणार म्हणून तहान भूक सर्व विसरून तो तसाच पळत राहिला. अर्थात संध्याकाळ पर्यंत त्याने बर्या पैकी जमीनीचा ताबा ही मिळवला आता खर म्हणजे थांबायला काहीच हरकत नव्हती पण जमीन तर त्याच्यापुढे अजूनही पसरली होती आणि त्याला खुणावत ही होती. म्हणूनच वेळ संपण्याच्या आत म्हणजे सूर्यास्ता पूर्वी जास्तीत जास्त जमीनीच्या हव्यासापायी तो जिवाच्या आकांतन परत एकदा पळत सुटला आणि लेखक म्हणतो की इथेच त्याचा निर्णय चुकला कारण दिवसभराच्या अतिश्रमाने तो थकला होता तशात पोटात काही नव्हते. परिणाम व्हायचा तोच झाला. वेळ संपली आणि तो तिथेच गतप्राण होवून कोसळला. नंतर परत उठलाच नाही. अती श्रमाने त्याचे निधन झाले. विशेष म्हणजे ज्या जमिनी पायी त्याने आपले प्राण गमावले होते त्याच्या मृत्यूनंतर ती फक्त त्याच्या करता साडेतीन हातच पुरेशी ठरली होती.
मुद्याच्या आधारे कथा खालील प्रकारे लीहिली आहे.
एक श्याम नावाचा माणूस होता . तो खूप लोभी प्रवृतिचा होता.
त्याने देवाची तपश्चर्या केली . त्याची तपश्चर्या पाहून देव त्यावर प्रसन्न झाला. देवाने त्याला म्हटले , मी तुझ्या वर प्रसन्न आहे, तुला मी एक वरदान देतो, तुला काय हवं आहे? "
श्याम म्हणाला, मी तुमचे फार आभारी आहे, मला जमीन पाहिजे.
देव म्हणाले , " बरं ,सूर्य मावळेपर्यंत पळून येशील तितकी जमीन तुझी. "
लोभी श्याम पळतच राहतो, सूर्यास्त होतो . शेवटी थकून जातो.
तो मरून पडतो . त्याला अतिलोभाचा फळ मिळवला .
शीर्षक : लोभी श्याम
शिक्षा : कधीही लोभ करायचे नाही.
#SPJ3