जोडगारे दुवे म्हणजे काय
Answers
Answer:
MAHARANA PRATAP
Explanation:
विद्यमान किंवा विलुप्त (निर्वंश) प्राणी आणि वनस्पती यांमध्ये काही अशा जाती, वंश, कुले किंवा गण आढळले आहेत की, त्यांच्या लक्षणांवरून ते इतर दोन संबंधित वंश, कुले किंवा गण यांच्यातील मध्यस्थ असावेत असा निष्कर्ष निघतो जणू काही ते त्या दोन्हींना जोडणारे दुवेच असावेत. कारण त्यांच्या लक्षणांमध्ये ज्या दोन्ही गटांना ते जोडतात त्यांच्या काही लक्षणांचे मिश्रण असते. त्यांपैकी जे जीव विलुप्त झाले असून फक्त जीवाश्मरूपांतच (शिळारूप अवशेषांतच) आढळतात त्यांना ‘हरवलेले दुवे’ व जे विद्यमान जीवांत आढळतात त्यांना ‘सजीव दुवे’ म्हणतात. पृथ्वीवर जीवांची अत्यंत जुनी अशी परंपरा असून ‘वर्तमान हे भूताचे अपत्य व भविष्याचे पितर आहे’. विद्यमान जीव प्राचीनांपासून क्रमाने विकास पावत [→ क्रमविकास] आले आहेत, या सिद्धांताला अनुसरून आजच्या जाती, वंश, कुले, गण इत्यादींच्या पूर्वजांची मालिका उपलब्ध होणे जरूर आहे. परंतु पृथ्वीच्या आरंभापासून आजतागायत ज्या अनेक प्रचंड घडामोडी झाल्या आहेत, त्यांमध्ये अनेक पूर्वज नष्ट झाले व त्यांपैकी काहींचेच फक्त जीवाश्म आढळतात व त्यांनाच हरवलेले दुवे म्हणतात तथापि त्यांचा उपयोग करून आजच्या जीवांच्या विकासाची सुसंगती लावता येते. क्रमविकासाच्या (उत्क्रांतीच्या) सिद्धांताला हा महत्त्वाचा पुरावा ठरतो. विद्यमान जीवांमध्ये आढळणाऱ्या अशा दुव्यांसारख्या जातींच्या माहितीमुळेही इतर विद्यमान आणि विलुप्त जीवांचे परस्परांशी आप्तसंबंध समजून येतात व समान पूर्वजपरंपरेच्या तत्त्वाची प्रचिती येते. पुढील काही उदाहरणांवरून वरील घटनेची सत्यता लक्षात येईल.
(१) बव्हेरियात १८६१ मध्ये मध्यजीव महाकल्पातील (सु. २३ ते ९ कोटी वर्षांपूर्वीच्या काळातील) ⇨ आर्किऑप्टेरिक्स नावाच्या कावळ्याएवढ्या पक्ष्याचा जीवाश्म आढळला. याची काही लक्षणे विद्यमान पक्ष्यासारखी आहेत. तथापि काही बाबतींत तो सरीसृपासारखा (सरपटणाऱ्या प्राण्यासारखा) होता यावरून पक्ष्यांपूर्वी विकास पावलेल्या सरीसृप पूर्वजांपासून विद्यमान ⇨पक्षी वर्ग विकास पावला असावा, अशा अनुमानाला बळकटी येते. हा प्राणी हरवलेला दुवा आहे. अशा सर्व विलुप्त पक्ष्यांचा (उदा., आकिऑर्निस) अंतर्भाव आर्किऑर्निथीज उपवर्गात केला आहे.
(२) ऑस्ट्रेलियात आढळणाऱ्या ⇨ प्लॅटिपस (डकबिल) आणि टॅकिग्लॉसस [→ काटेरी मुंगीखाऊ] ह्या प्रारंभिक स्तनी प्राण्यांची काही लक्षणे सरीसृपांप्रमाणे व काही स्तनी प्राण्यांप्रमाणे असल्याने सरीसृप पूर्वजांपासून स्तनी प्राणी विकास पावले असावेत, या विधानाला बळकटी येते. हे प्राणी जिवंत दुवे आहेत.
(३) ऑनिकोफोरा या प्राणिसंघातील ⇨ पेरिपॅटस हा नखरी प्राणी वलयी प्राणी [ → ॲनेलिडा] व संधिपाद प्राणी [→ आर्थ्रोपोडा] या दोन्हींतील जिवंत दुवा समजतात, कारण दोन्ही संघांची काही लक्षणे त्यात आढळतात.
(४) दक्षिण आफ्रिकेतील आफ्रिकी कपिमानव (ऑस्ट्रॅलोपिथेकस) सु. दहा लाख वर्षांपूर्वी अस्तित्वात होता. तो कपि-कुल व मानव-कुल यांना जोडणारा दुवा (हरवलेला दुवा) मानला जातो. कारण त्याची काही लक्षणे कपीप्रमाणे व काही मानवाप्रमाणे होती [→ नरवानर गण].
(५) मध्य सिल्युरियन ते मध्य डेव्होनियन या काळात (सु. ४६ ते ४२ कोटी वर्षांपूर्वीच्या काळात) पृथ्वीवर असलेल्या स्थलवासी वनस्पतींत सर्वांत प्राचीन व अत्यंत साध्या वाहिनावंत (पाणी किंवा अन्नरसाची ने-आण करणारे शरीरघटक असणाऱ्या) वनस्पतींचे जीवाश्म आढळले असून विद्यमान ⇨ सायलोटेलीझ या गणातील वनस्पतींशी त्यांचे निकट आप्तसंबंध आहेत. त्यांचा समावेश ⇨ सायलोफायटेलीझ या विलुप्त गणात केला आहे. त्यांची काही लक्षणे हिरव्या ⇨ शैवालासारखी व काही ⇨टेरिडोफायटाप्रमाणे असल्याने त्यांना या दोन्हीतील (म्हणजे शैवाले आणि टेरिडोफायटा, विशेषतः सायलोफायटेलीझ लायकोपोडिएलीझ यांमधील) हरवलेला दुवा मानतात.
(६) बीजी वनस्पती व ⇨ नेचे या दोन्ही गटांची लक्षणे ⇨ बीजी नेचे (टेरिडोस्पर्मी) ह्या प्राचीन व विलुप्त (डेव्होनियन ते जुरासिक म्हणजे सु. ४२ ते १५·५ कोटी वर्षांपूर्वीच्या काळातील) वनस्पतींत आढळतात. बीजे धारण करणारे नेचे आज अस्तित्वात नाहीत. प्रांरभिक नेचांपासून बीजी नेचांच्या द्वारे विद्यमान बीजी वनस्पती विकास पावल्या असाव्यात असे अनुमान यावरून काढले जाते, म्हणून बीजी नेचे हा गट जोडणारा दुवा ठरतो. तसेच उत्तर पुराजीव महाकल्पात (सु. ४२ ते २४·५ कोटी वर्षांपूर्वींच्या काळात) आणि मध्यजीव महाकल्पात आढळळेल्या ⇨ बेनेटाइटेलीझ या प्राचीन प्रकटबीज वनस्पतींची लक्षणे ⇨ सायकॅडेलीझ व बीजी नेचे यांच्या लक्षणांचे मिश्रण असल्याने बेनेटाइटेलीझ हा विलुप्त गट या दोन्ही गटांना जोडणारा पण हरवलेला दुवा असावा, असे काहींचे मत आहे इतकेच नव्हे, तर त्यांच्यासारख्या पूर्वजांपासून फुलझाडांचा म्हणजे आवृतबीज वनस्पतींचा [→ वनस्पति, आवृतबीज उपविभाग] क्रमविकास झाला असणे संभवनीय आहे. ⇨नीटेलीझ या विद्यमान प्रकटबीज वनस्पतींतही [→ वनस्पति, प्रकटबीज उपविभाग] काही लक्षणे आवृतबीजीप्रमाणे आढळतात, त्यामुळे त्यांनाही दोन्हीतील जोडणारा दुवा मानावा, असे काहींचे मत आहे.
(७) गिंको बायलोबा (मेडन हेअर ट्री) हा ⇨ गिंकोएलीझ या गणातील एकमेव विद्यमान वृक्ष बीजी वनस्पतींतील सर्वांत प्राचीन वंशातील जाती असून हा गण पुराजीव महाकल्पातील उत्तर पर्मियन कल्पापर्यंत (सु. २४·५ कोटी वर्षांपूर्वीच्या काळापर्यंत) आढळतो. मध्यजीव महाकल्पाच्या मध्यास तर त्याच्या विकासाची चरमावस्था होती. त्याचा उगम ⇨कॉर्डाइटेलीझ, ⇨सायकॅडेलीझ व ⇨बेनेटाइटेलीझ (सायकॅडिऑइडेलीझ) यांच्या बरोबरीने पण बीजी नेचांपासून झाला असून आज त्याच्यात प्रकटबीजींपैकी सायकॅडेलीझ व ⇨कॉनिफेरेलीझ यांच्या काही लक्षणांचे मिश्रण आढळते तथापि त्यांच्यापासून पुढे कोणताच नवीन गट उगम पावला नसल्याने व त्याचा स्वतःचा उगम फारच प्राचीन काळी झाला असल्याने त्यांना जोडणारा दुवा न म्हणता ‘जिवंत जीवाश्म’ म्हणतात.