जाग
(२) महमूद गावानने कोणत्या सुधारणा केल्या ?
Answers
महमूद गावानने जमीन महसूल व्यवस्थेत सुधारणा केली. राज्यात आर्थिक सामर्थ्य प्राप्त करून दिले. अरबी व फारसी विद्यांच्या अभ्यासासाठी बिदर येथे मदरसा स्थापन केली.
महमूद गावान : (१४११ ?–५ एप्रिल १४८१). दक्षिण हिंदुस्थानातील बहमनी राज्यातील कार्यक्षम प्रशासक व मुत्सद्दीमुख्यमंत्री. त्याचे पूर्ण नाव निजामुद्दीन महमूद गिलानी ऊर्फ महमूद गावान. त्याचा जन्म इराणमधील गिलान राज्यांतर्गत गावाँ ह्या खेड्यात झाला. त्याच्या पूर्व आयुष्याबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही पण इ.स.१४५३ मध्ये सुलतान अहमदशाहच्या वेळी (कार. १४३६−५८) खोरासानातून व्यापाराच्या निमित्ताने वयाच्या चाळिसाव्या वर्षी ती बीदर येथे आला आणि आपल्या मुत्सेद्दिगिरीने त्याने बहमनी सत्तेत एक महत्त्वपूर्ण स्थान मिळविले. अहमदशाहच्या कारकीर्दीत प्रारंभी त्यान बहुमनी सत्तेला स्थैर्य मिळविण्यासाठी दख्कनी आणि अराणी (परकीय) यांत समझोता घडवून आणण्याचा प्रयत्न केला आणि हिंदु-मुसलमान यांतील भेदही शमविला. अलाउद्दीन अहमदशाहच्या मृत्युनंतर हुमायूनशाह (कार. १४५८−६१) गादीवर आला. हुमायूनशाह क्रूर होता, असे फिरिश्ता व बुर्ऱ्हान-इ-मासिरचा लेखक यांनी म्हटले असले, तरी गावनच्या पत्रांतून त्याच्याविषयी आदरच दिसतो.
सुलतान अहमदशाहनंतर हुमायूनशाह याने त्याची मुख्य वजीर म्हणून नियुक्ती केली. हुमायूनशाहच्या अकाली मृत्युनंतर निजामुद्दीन अहमदशाह (कार. १४६१-६२) आणि शमशुद्दीन मुहंमद (कार. १४६३−८२) हे अल्वयीन मुलगे अनुक्रमे वहमनी तख्तावर आले. त्यांच्या कारकीर्दींत राणी मख्दूमजहान नर्गिस वेगम ही महमूद गावान व ख्वाजाजहाँ तुर्क यांच्या मदतीने (त्रिसद्स्य समिती) राज्यकारभार पाहत असे. तिला ख्वाजाजहाँच्या संशयास्पद वर्तनाचा सुगावा लागताच तिने त्यास ठार मारले आणि राज्याचे सर्वोच्च अधिकार महमूद गावनच्या हाती दिले. त्याला ख्वाजाजहाँ ही उपाधी आणि वकील-ए-सल्तनत हे पद दिले. या पुढील सु. वीस वर्षांचा काळ हा ‘गावान कालखँड’ म्हणून वहमनी सत्तेच्या इतिहासात प्रसिद्ध आहे.
महमूद गावानने जमीन महसूल व्यवस्थेत सुधारणा केली. राज्यात आर्थिक सामर्थ्य प्राप्त करून दिले. अरबी व फारसी विद्यांच्या अभ्यासासाठी बिदर येथे मदरसा स्थापन केली.