जंगल भ्रमंती यावर तुमचे आणुभव कथन करा
Answers
Answer:
गेल्या आठवड्यात चांदोली अभयारण्यात नऊ पर्यटक चुकल्याची बातमी वाचली आणि मला आमचा मागच्या वर्षाचा उन्हाळी ट्रेक आठवला.
साधारणपणे उन्हाळ्याचे दिवस म्हणजे भटकी जमात घरी सापडण्याची शक्यता. पण आमची डोकी सदा फिरलेलीच त्यामुळे उन्हाळ्यात घरी बसण्यापेक्षा कुठेतरी जायला पाहिजे म्हणून चांदोली अभयारण्याचा प्लॅन निघाला...जंगली जयगड, भैरवगड आणि प्रचितगड हे दुर्गत्रिकुट घनदाट अरण्याने वेढलेले आहे. अस्वल, गवे आणि इतरही प्राणीसंपदा इथे मुबलक आहे. त्यामुळे उन्हाळ्यात जर आपण इथला ट्रेक केला तर प्राणीपण पाहता येतील आणि उन्हाळाही सत्कारणी लागेल असा विचार करत प्लॅन ठरवलाही.
नेहमीप्रमाणे मुंबईवरून स्वप्नील आणि अमेय येणार होते आणि मी आणि पुण्याचा एक प्रणव महाजन म्हणून एकजण त्यांना रात्री पुणे स्टेशनवर गाठणार होतो. रात्री उशीराची गाडी असल्यामुळे मी सॅक चक्क ऑफीसमध्येच आणून ठेवली आणि एक दिवसाची सुट्टी वाचवली. पण निघता निघता जाम उशीर झाला आणि गाडी सुटायची वेळी झाली तेव्हाही मी तिकीटाच्या लायनीतच उभा होतो. शेवटी अगदी कळवळून
"पाहुणा आजारी आहे हो, या गाडीला जायलाच पायजं," असं म्हणत रांग मोडून पुढे घुसलो आणि कसेबसे तिकीट मिळवून धाव ठोकली.
पाठीवर अवजड सॅक घेऊन स्टेशनचे जिने चढणे आणि तिथल्या गुळगुळीत फरश्यांवर धावणे किती जिकीरीचे आहे याचा अनुभव घेतच जनरलचा डब्बा गाठला. अपेक्षेप्रमाणेच तो तुडुंब भरला होता पण अमेय आणि स्वप्नीलने एक जागा पकडून ठेवली होती. घामेजलेल्या अंगाने बसकण मारली आणि म्हणालो
वाह ट्रेकची सुरूवात तर भारीच झाली.
पहाटेच्या सुमारास कधीतरी कराडला पोचलो. तिथे स्टेशनच्या बाहेर मस्त गरमागरम पोहे, उपीट असा भरपेट नाष्टा करून कोयनानगरमार्गे नवजाच्या दिशेने सुटलो. रात्री झोप अशी झालीच नसल्याने गाडीत पुरी करण्याचा बेत त्या एसटी ड्रायव्हरने पुरता मोडून काढला. ज्या सुसाट वेगाने खडबडीत रस्त्यावरून तो भरधाव निघाला होता ते पाहून नवजाला जाईपर्यंत हाड-न-हाड खिळखिळे होणार याची खात्रीच पटली.
जंगली जयगडला जाण्यासाठी नवजा गावात जाण्यापेक्षा त्याआधी लागणार्या कोयनानगर वीज विद्युत प्रकल्पापाशी उतरणे जास्त सोयीचे पडते. अवघडलेल्या अंगाने आणि रात्रीच्या जागरणाने लाल झालेले डोळे घेऊन जेव्हा आळोखेपिळोखे देत त्या प्रकल्पाच्या वसाहतीपाशी उतरलो तेव्हा जंगली जयगडचे घनदाट जंगल आमचे स्वागत करायला समोरच ठाकले होते.
Step-by-step explanation:
Mark as brainlest please