जंगलाने सर्वांचे स्वागत केले - दिलखुलास, मनमोकळे, जंगलाचा स्वभावच असा मोकळाढाकळा
असतो. अढी धरावी, तेढ बाळगावी
यासाठीसुद्धा एखादा कोपरा लागतो. जंगलाला असा कोपरा नसतो. माणसं
आणि त्यांची घरं यांना कोपरे असतात म्हणून ती जंगलाइतकी मुक्त, मोकळी नसतात. जंगल मनमोकळे असते.
सहजसुंदर असते. ऊनपावसाशी ते लपंडाव खेळते. थंडीवाऱ्याशी गप्पा मारते. फुलताना, खेळताना, डुलताना,
हसताना ते मनापासून सगळे काही करते. एप्रिलचा हा महिना, उन्हाळ्याचे दिवस, भामरागडच्या जंगलाची वेश
बदलण्याची वेळ, तर त्या जंगलाने अंगाखांद्यावरची पर्णभूषणे ढाळलेली दिसली. त्यातही संकोच नाही, की संशय
नाही. त्यामुळे जमीन दिसू नये इतका हातभर खाली वाळलेल्या पानांचा सुंदर सडा. राखाडी, पिंगट रंगाचा.
हलकेच त्यात शिरायचा तेव्हा सळसळ आवाज व्हायचा. नागमोडी पाऊलवाटेने चालताना जेव्हा पावले त्यावर
पडायची तेव्हा त्यातून चर्रर्र आवाज उठायचा. जणू जंगल बोलते आहे असे वाटते. जंगल कुजबुजते आहे असे
भासते. वेळूच्या घनदाट बनात वारा घुमतो तेव्हा तो गाणे होऊनच घुमत घुमत बाहेर पडतो. पानं, फांद्या, फुलं
सर्वांनीच जंगल हसते, गाते आणि डुलते पावसाच्या सरी झेलते. सचैल न्हाते. भिजत चिंब होऊन जाते.
या उताऱ्याचे ⅓ सारांशलेखन करा
Answers
Answered by
0
Answer:
दोनों विमल दो
Explanation:
घोड़ों gringo यहीं पाक रेडियो खर्चों सुबहो सूची अतएव dj स्तंभों छठवीं cuckoo
Similar questions