जंगलातील बिबट्याचे आत्मवृत्त
Answers
Explanation:
नमस्कार! मी बिबट्या बोलतोय, होय बिबट्याच! सध्या सतत माझ्याबद्दल चर्चासत्र चालू आहे. म्हटलं, आज माझ गार्हाण मांडावच! अहो, अवैध शिकार आणि अधिवासाचा नाश अशा कारणांमुळे माझे अस्तित्व धोक्यात आले आहे, पण माझ्या परिस्थितीशी जुळवून घेण्याच्या जीवशास्त्रामुळे माझे अस्तित्व आजपर्यंत टिकवून आहे. पण आता माझ्या पुढच्या पिढ्यांचं भवितव्य धोक्यात आहे. म्हणूनच या आपल्यातील परसपर संबंधांमध्ये प्रश्न सोडवण्यासाठी माझ्यावर जास्त लक्ष देण्यापेक्षा, तुम्हा माणसांमध्ये जागरुकता निर्माण करणे, ही काळाची गरज आहे...
बिबट्या! अहो, बिब्बा झाडाच्या बियांमुळे माणसाच्या त्वचेवर पुरळ उठून ठिपके तयार होतात. यावरून महाराष्ट्रात बिबट्या हे नाव पडलं. सोनेरी रंगावर गुलाबाच्या पाकळ्यांसारखे दिसणारे काळे पोकळ ठिपके असणारा बिबळ्यासुद्धा मीच! मी नेहमी परिस्थितीशी जुळवून घेणारा आणि वर्षानुवर्षे मानवी वस्तीच्या जवळ राहणारा असा हा मांजर कुळातील मांसभक्षीय प्राणी, इतर वन्यप्राण्यांप्रमाणेच मी सुद्धा माणसाला घाबरतो. मी उंदीर, बेडूक माझ्या आवाक्यात बसणारे हरीण, सांबर असे प्राणी खाऊ शकतो. आपल्या महाराष्ट्राच्या पश्चिम घाटात चहूबाजूने पर्वतरांगा नटलेल्या आहेत, त्या भागात मोठ्या प्रमाणावर शेती केली जाते. आपल्याकडे एक समज आहे की, वन्यप्राणी हे फक्त जंगलातच राहतात पण शेतीप्रधान असलेल्या आणि माणसांची घनदाट वस्ती असलेल्या या भागात आम्हां वन्यप्राण्यांचा वावरसुद्धा आढळतो. कसंय, संरक्षित जंगलाच्या हद्दी या तुम्ही लोकांनी स्वतःसाठी बनविलेल्या आहेत, पण आम्हां प्राण्यांना या हद्दी कळणारच कशा? तुमच्या मनातील अजून काही पश्न जसे, ‘हे बिबटे शेतात का राहतात? एवढे बिबटे आले कुठून, जसे की, बिबट्यांची जागा जंगलातच आहे म्हणून त्यांना जंगलात परत सोडून दिले पाहिजे. आपल्या भागात बिबट्यांची संख्या खूप वाढली आहे, माणूस हे त्याचे अन्न आहे,’ इ. माझ्याबद्दल असलेल्या अपुऱ्या माहितीमुळे लोकांच्या मनात भीती निर्माण करते. या भीतीमुळे ‘या प्राण्याला पकडा आणि दूर सोडून द्या,’ असे गार्हाणे लोकांकडून शासकीय खात्यांकडे मांडले जाते. पण जनमाणसांनो, आम्हां प्रत्येक बिबट्याचे स्वतःचे एक क्षेत्र असते. एखाद्या भागातून एक बिबट्या काढला तरी ती जागा रिकामी राहत नाही. ती जागा दुसर्या बिबट्याकडून घेतली जाते. त्या भागात खायला मुबलक खाद्य, पाणी आणि लपायला जागा हे पुरेसे उपलब्ध असल्यास एकापेक्षा जास्त बिबटे तिथे राहू शकतात. त्यामुळे बिबटे पकडून दुसरीकडे सोडल्यास त्यांची संख्या कमी तर होत नाहीच पण वाढते.
जरी एखाद्या बिबट्याला दूर सोडले तरी तो त्या जागी परत येण्याचा प्रयत्न करतोच, अगदी तुमच्या घरातील मांजराप्रमाणेच, शेवटी माझी मावशीच ती! अहो, आम्हां बिबट्याना एखाद्या ठिकाणाहून दुसरीकडे सोडल्यास परिस्थितीला गांगरून गेल्यामुळे माणसासाठी हानिकारक ठरते, नुकत्याच नाशिकमध्ये घडलेल्या प्रसंगात किती गांगरून गेलो होतो मी. केवढी ती बघ्याची गर्दी, बापरे!...खूप भांबावून गेलो होतो लोकांच्या आरडाओरडने, जेव्हा मी माझा जीव वाचविण्याच्या प्रयत्नात प्राणीप्रेमीवर वा वनरक्षकांवर हल्ला करण्याच्या प्रयत्न करतो ना अन् त्यात त्यांना दुःखापत होते, मनापासून वाईट वाटतं. कारण, ते आहेत म्हणून मी सुरक्षित संचार करू शकतो. नाहीतर, माझा जीव मुठीत धरून इकडेतिकडे जगेल. तुम्हाला आम्हां प्राण्याबद्दल खूप कमी माहिती आहे, म्हणूनच आज तुमच्या मनात माझ्याबद्दल भीती कमी करण्याचा प्रयत्न.
लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी “जाणता वाघोबा” यासारखे प्रकल्प राबविण्यात आले आहेत, ज्यात माझे जीवशास्त्र आणि सुरक्षिततेचे उपाय रेखाटण्यात आले आहेत. लोकांशी आणि मुलांशी प्रभावीपणे संपर्क साधण्यासाठी कला या माध्यमाचा उपयोग करण्याच्या उद्देशाने ही साधने बनविण्यात आली. तसेच, आपव्या नाशिकमधील “इको एको” यासारख्या स्वयंसेवी संस्था माणूस आणि बिबट्या दोघांसाठी उपयोगी ठरू शकतात. एखाद्या भागातील पर्यावरणासंबंधी जे संशोधन केले जाते, ते तिकडच्या स्थानिक लोकांपर्यंत योग्यरित्या पोहोचले तर पर्यावरणाचे संवर्धन होण्यास नक्कीच मदत होईल. यासाठी स्थानिक लोकांचा सहभाग असणे अनिवार्य आहे. एखाद्या संवर्धनामध्ये माणूस आणि प्राणी यांना समान प्राधान्य असणे खूप महत्त्वाचे आहे.
महाराष्ट्रामध्ये वारली, गौंड, महादेव कोळी आणि ठाकर असे काही समाज आहेत जे माझ्यासोबत पिढ्यांपिढ्या पारंपरिकरित्या राहतात. त्यामुळे त्यांना माझ्या (बिबट्याच्या) सवयी आणि त्यांच्या पशुधनाची काळजी कशी घ्यावी, यावर सखोल ज्ञान असते. हे समूह वाघाला अथवा मला ‘वाघोबा’च्या रूपात पूजतातसुद्धा! ज्याप्रमाणे गावाच्या वेशीवर गावदेवीची मूर्ती असते, वाघोबा ही एखादी मूर्तीही दगडाच्या स्वरूपातही असते. लोकांची श्रद्धा अशी आहे की, गावदेवी गावाची रक्षा करते त्याचप्रमाणे वाघोबा जंगलाचे रक्षण करतो. या भागातील लोकांना आम्हां बिबट्याबद्दल इत्यंभूत माहिती असल्यामुळे बिबट्याही आपल्या सभोवतालच्या सृष्टीचा भाग आहे, याची जाणीव या लोकांमध्ये असते. ही सर्व माहिती संशोधन आणि जे समूह या मांजर कुळातील प्राण्यांसोबत एकाच अधिवासात राहतात त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीवर आधारित आहे, हे माझ्याबद्दल माहिती मिळविताना कळेल.
नाशिकमधील निफाड तालुका हा गोदावरी नदीच्या काठावर वसलेला असून सुपीक भागात जनजागृतीसाठी आम्हां बिबट्याचा वावर असलेल्या गावातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये शासकीय अधिकारी, वनाधिकारी, संरपच तसेच इतर मान्यवर मंडळी यांच्या परवानगीशिवाय व नेतृत्वाखाली मानव-बिबट्या परस्पर संबंध यांवर व्याख्यान आयोजित करण्यात येते. पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या समजण्याच्या पात्रतेनुसार माहिती देण्यात येते. या व्याख्यानानंतर मुलांशी चर्चा करण्यात येते आणि मुलांच्या प्रश्नांचे निरसन करण्यात येते. ज्या मुलांना प्रबोधन करण्यात गोडी आहे, अशा मुलांना ‘बिबट्यादूत’ म्हणून ओळखले जातात.
Answer:
hicfrkrkrkrkktotk
Explanation:
jrikdfikfogooguriirorofkf