जागरूक नागरिक या नात्याने अवदुंबर उद्यानासमोरील
रस्त्यावर नवीन सिग्नल यंत्रणा बसऊन देण्याची मागणी करणारे पत्र मा. वाहतूक अधिकारी यांना लिहा
Answers
पत्र लेखन
Explanation:
शंकर गायकवाड,
सागर विला,
क्रांतीनगर.
सोलापुर.
दिनांक: १७ नोव्हेंबर, २०२१
प्रति,
माननीय वाहतूक अधिकारी,
सोलापुर.
विषय: रस्त्यावर सिग्नल यंत्रणा बसवून देण्याबाबत.
महोदय,
मी, शंकर गायकवाड, कीर्तिनगरचा रहिवाशी या नात्याने हे पत्र लिहत आहे. या पत्राद्वारे मी तुम्हाला विनंती करतो की आमच्या विभागातील अवदुंबर उद्यानासमोरील रस्त्यावर ट्रैफिस सिग्नल यंत्रणा बसवण्यात यावे.
अवदुंबर उद्यानासमोरील रस्त्यावर रोज भरपूर ट्रैफिक होते. तसेच या रस्त्यावर गाड्यांचे,कामाला जाणाऱ्या लोकांचे, लहान मुलांचे व वृद्धांचे येणे जाणे चालू असते. येथे ट्रैफिक सिग्नल नसल्यामुळे लोकांना रस्ता ओलांडताना त्रास होतो कारण समोरून गाड्या वेगाने येतात.
मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही या रस्त्यावर त्वरित ट्रैफिक सिग्नल यंत्रणा बसवून द्यावे, जेणेकरून आम्हा रहिवाशांची समस्यांपासून सुटका होईल.
धन्यवाद.
आपला कृपाभिलाषी,
शंकर गायकवाड