CBSE BOARD XII, asked by samarth84140, 1 month ago

जागतिक बॅक
म्हणजे काय​

Answers

Answered by shrikantmohite76
2

Answer:

जागतिक बॅंक (इंग्लिश: World Bank, वर्ल्ड बॅंक) ही एक आंतरराष्ट्रीय वित्त आणि पतपुरवठा संस्था आहे. हीची स्थापना डिसेंबर २७, इ.स. १९४५ मध्ये झाली. ब्रेटन वुडस् पद्धती (इंग्लिश: Bretton Woods System) समितीच्या जागतिक आर्थिक नियंत्रण शिफारशीं वापरण्यात आल्या होत्या. या समिती मध्ये ४५ मित्रराष्ट्रे होती. विकसनशील देश व अविकसित देश यांना विकासासाठी कर्जपुरवठा करणारी संस्था असे याचे स्वरूप आहे. या बंकेने पहिले कर्ज फ्रांस या देशाला दिले.

वॉशिंग्टन डी.सी, अमेरिकेची संयुक्त संस्थाने येथील जागतिक बॅंकेच्या मुख्यालयाची इमारत.

गरीबी दूर करण्यासाठी ही बॅंक जगभरात विषेश प्रयत्नशील आहे.

जागतिक बॅंकेची उद्दिष्टे खालील प्रमाणे आहेत :

सरकारांचे सबलीकरण व सरकारी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण

अर्थव्यवस्थांचा विकास

भ्रष्टाचार निर्मूलन

गरीबी हटाव

संशोधन व शिक्षण

शिक्षणासाठी जागतिक बॅंक विषेश परिश्रम घेते. या साठी आंतरजालाधारित प्रशिक्षण व इतर पर्यायांचा उपयोग केला जात आहे.

भारतासहित अनेक देशांना या बॅंकेने विवीध प्रकल्पासाठी कर्जे दिली आहेत. पैकी भारतातील गुजरात मधील नर्मदा नदी वरील विवादास्पद धरण सरदार सरोवर प्रकल्पाचे कर्ज या बेंकेने प्रकल्पातील धोके दिसून आल्याने परत घेतली आहे.

इ.स. १९९८ सालातल्या मंदीच्या काळात या जागतिक बॅंकेने मेक्सिको व इंडोनेशिया या देशांना दिलेला सल्ला आर्थीक दॄष्ट्या अतिशय धोक्याचा ठरला आहे

Similar questions