India Languages, asked by jaya6681, 3 months ago

जागतिक जल दिवस information in marathi?​

Answers

Answered by monaabhisingh
1

Answer:

plz mark me brainlist

Explanation:

जागतिक जल दिन' हा एक आंतरराष्टीय दिवस आहे.प्रतिवर्षी २२ मार्च रोजी हा दिवस साजरा करण्यात येतो.[१]स्वच्छ आणि ताज्या पाण्याच्या नैसर्गिक स्रोतांची काळजी घेणे व त्यांच्या शाश्वत संरक्षणासाठी कार्यरत राहणे याचा संदेश देणे यासाठी या दिवसाची योजना केली गेली आहे.

आज, २२ मार्च रोजी जगभरात जलदिन साजरा केला जातो. त्याबद्दल ही माहिती:

>> २२ मार्च १९९३ रोजी, संयुक्त राष्ट्रांनी आपल्याकडे असलेल्या गोड्या पाण्याचे (fresh water) महत्त्व लोकांना कळावे म्हणून हा दिवस साजरा करण्यास सुरुवात केली.

>> शुद्ध, स्वच्छ आणि कायमस्वरूपी पाणी मिळणे हा सर्वांचा मूलभूत हक्क आहे.

>> आजही, खूपशा भागांमध्ये अनेक लोकांना त्यांच्या घरात, गावांमध्ये, शाळांमध्ये पुरसे पाणी मिळत नाही.

>> रंग, जात, लिंग, स्त्रिया-मुले, निर्वासित, दिव्यांग, श्रीमंत-गरीब, अल्पभूधारक अशा भेदभावामुळे हे लोक पाण्यापासून वंचित राहतात. निर्णय प्रक्रियेमध्ये या लोकांचा आवाज ऐकला जावा म्हणून यंदाचा विषय आहे, Leaving No one Behind : पाणी सर्वांसाठी.

पाण्यासंबंधित विविध विषय, समस्या यांची ओळख व्हावी म्हणून दरवर्षी एका विषयाची निवड केली जाते. त्या विषयाला अनुसरून वेगवेगळ्या उपक्रमांचे, कार्यक्रमांचे आणि स्पर्धांचे आयोजन होते. अनेक देश आता हा दिवस साजरा करतात.

यंदाचा दुष्काळ, लक्षात घेता “पाणी सर्वांसाठी” उपलब्ध होण्यासाठी आपण पण हातभार लावूयात.

जागतिक जल दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!

-------------------

Similar questions