(१) जागतिकीकरणाने बाजारपेठीय अर्थव्यवस्था ही
संकल्पना जाणली.
Answers
Answer:
ग्युटेनबर्ग हा आधुनिक छपाईचा जन्मदाता. १४३९ किंवा त्या आसपास कधीतरी, आपलेच अनेक वेगवेगळे शोध एकत्र करून मोठ्या प्रमाणावर छापील पुस्तकांचं उत्पादन करायला सुरूवात केली. आणि जगाला ज्ञानाच्या आणि मनोरंजनाच्या महाप्रचंड दालनाचं दार प्रथम उघडून दिले. या क्रांतीच्या आधीही काहीशा कमी वेगानं ही प्रक्रिया चालू होती. चीनमध्ये जुन्या काळी कागदाचा शोध लागला, इतरही देशांत कागदसदृश काहीतरी वापरलं जात होतं. ठसे होते, अगदी जुजबी छपाई वेगवेगळ्या स्वरूपांत चालू होती. पण अगदी जुन्या काळी ते बहुधा राजांना, सरदारांनाच परवडत असावं. नाहीतर काही हजार वर्षांपूर्वी भारतासारख्या देशात मौखिक वाङमयाची परंपरा नसती. पिढ्यान्-पिढ्यांच्या मेंदूंचा वापर मंत्र-स्तोत्रं-काव्य-सूत्रं घटवून, पाठ करून, साठवून ठेवण्यासाठी झाला नसता. पण तो इतिहास तंत्रज्ञानाच्या तत्कालीन मर्यादांचं द्योतक आहे. 'मी आज वीस वर्षं जो अनुभव गाठीशी बांधला तो माझ्याबरोबर नष्ट होणार. माझ्या मुलाला त्याचा पूर्णपणे उपयोग करणं शक्य नाही.' ही भयावह कल्पना आहे. माझे अनुभव, माझं ज्ञान काही ना काही स्वरूपात माझ्या पुढच्या पिढीला मी देण्याचा प्रयत्न करावा, या विचाराला ना काळाचं बंधन, ना संस्कृतीचं. हा आदिम विचार आहे. अन्न, पाणी, श्वास या माझ्या जीवनाच्या अनिवार्य गरजा आहेत, माझी जनुकं पुढे नेण्यासाठी संतती उत्पन्न करावी, आणि आपला जीव शक्यतोवर जपावा या विचारांप्रमाणे. सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्टच्या तत्त्वामागच्या या मूलभूत ऊर्मी आहेत. १४३९च्या फार फार आधीचं जग कसं होतं याची आता आपल्याला कल्पनाही करता येणं शक्य नाही. 'काला अक्षर भँस बराबर' म्हणणारी माणसं कदाचित त्याकाळी अस्तित्वात असलेल्या अक्षरांपेक्षा जास्त असावीत. ही थोडी अतिशयोक्ती झाली हे मान्य केलं तरी त्या वेळचं आयुष्य हे अंधाराचं होतं. ज्ञानाचे मिणमिणते दिवे कुठेतरी दूर तेवत असायचे, बिरबल बादशहाच्या गोष्टीतल्या थंड तळ्यात उभ्या असलेल्या समाजाला आशा देत. त्या मानाने आता शहरी झगमगाट आहे. रस्त्यात, घरोघरी दिवे आहेत. पुस्तकं, टीव्ही, इंटरनेट, सेलफोन या सगळ्यांतून आपल्यावर अक्षरांचा, चित्रांचा, गाण्यांचा, व्हिडियोंचा भडिमार होत असतो. एके काळचा अंधाराचा प्रश्न जाऊन आता निऑनी झगमगाटाने दिपून नजाण्या
चा नवीन प्रश्न निर्माण व्हावा, इतका बदल झालेला आहे. गेली कित्येक शतकं चालू असलेल्या या बदलानं गेल्या काही दशकांत प्रचंड वेग घेतलेला आहे. संगीत, चित्र, ध्वनी, अक्षरं ही वेगवेगळी माध्यमं एके काळी होती. या सगळ्यांचंच आता डिजिटल क्रांतीतून एकसंधीकरण झालेलं आहे. या माध्यमांद्वारे निर्माण होणाऱ्या कला, ज्ञान, माहिती, बातम्या आणि करमणूक यांवरही या क्रांतीचा परिणाम झाला तर नवल नाही. हा बदल झालेला आपल्याला तुकड्यातुकड्यांतून दिसतोच. एके काळी बातम्यांसाठी वर्तमानपत्रं, वाचनासाठी पुस्तकं आणि करमणुकीसाठी प्रत्यक्ष सादर केलेले कार्यक्रम - नाच, गाणी, नाटकं असायची. त्यानंतर हळूहळू रेडियो, फोन, सिनेमा, टीव्ही, म्युझिक प्लेअर्स या सगळ्या गोष्टींनी या तिन्हींच्या सीमारेखा धूसर केल्या. रेडियोवर संगीत आणि बातम्या ऐकू यायला लागल्या. टीव्हीवर बातम्या आणि मनोरंजनाचे कार्यक्रमही दिसू लागले. लिखित शब्दांची जागा मोठ्या प्रमाणावर चित्रित आणि उच्चारित शब्दांनी घेतली. इंटरनेट आल्यापासून तर या सगळ्याचंच इतकं प्रचंड मिश्रण झालेलं आहे, की विचारायची सोय नाही. या क्रांतीचं वर्णन करताना माध्यमस्फोट, विचारस्फोट, चित्रस्फोट असेच शब्द वापरावे लागतात. १४३९पासून ते आत्तापर्यंत प्रचंड प्रवास झाला याबद्दल कुणाचंच दुमत नसावं. पण आत्ता आपण नक्की कुठे आहोत? माहिती आणि करमणूक या दोन मुख्य बाबतींत आपली सध्याची वागणूक काय आहे? एक मनुष्य म्हणून आपण या दोन सेवांचा उपभोग कसा घेतो? या सेवा पुरवणाऱ्या व्यक्ती व संस्था सध्याच्या उपभोक्त्याच्या गरजा पुरवायला समर्थ आहेत का? पन्नास वर्षांपूर्वी जन्मलेल्यांनी त्या वेळचं आसपासचं जग पाहिलं तर त्या वेळी त्यांना आजच्या जगाची कल्पना आली असती का? तीस वर्षांनी काय होईल याची आत्ता कल्पना करता येईल का? माध्यमांचं आणि त्यातून येणाऱ्या अनुभवांचं विश्व हे खरोखरच एखाद्या भूगर्भशास्त्रीयदृष्ट्या सक्रिय अस्थिर प्रदेशाशी करता येईल. नवीन जमीन तयार होते, आधीची बुडून पाण्याखाली जाते. ज्वालामुखींचे स्फोट होतात आणि लाव्हा पसरून काही काळ सुकतो. तो स्थिर होतोय असं वाटतं ना वाटतं तोच एखादा भूकंप होतो, उत्पात होतात, वरची जमीन खाली जाते. डोंगर, पर्वत उभे रहातात. काही वाऱ्या-पाण्याने झिजून जातात. पुढे काय होणार याचा अंदाज ही तर दूरचीच गोष्ट झाली. आत्ताचा नकाशा नक्की काय आहे, कुठे हालचाल चालू आहे, याबाबतही आपल्याला खात्रीने सांगता येत नाही.