India Languages, asked by shriramr141, 4 months ago

जागतिक मराठी भाषा दिवस कधी असतो? भाषा म्हणजे काय?
भाषा आणि संस्कृती यातील फरक काय?​

Answers

Answered by Anonymous
3

Answer:

जागतिक भाषा दिन हा 27 फेब्रुवारी ला असतो .

भाषेविषयीचे कुतूहल प्राचीन काळापासून माणसाला वाटत आले आहे. अगदी पूर्वीपासूनच लोकपरंपरेत भाषेच्या उगमाबद्दल, शक्तीबद्दल विविध आख्यायिका, कहाण्या प्रचलित होत्या, तो त्या कुतूहलाच्याच पूर्तीचा प्रयत्न होय. भाषा हे आपल्या अंतरंगातील मनोगत, भावना, विचार इत्यादि प्रगट करण्याचे साधन आहे, ही जाणीव तर पूर्वीपासून होतीच. पण या साधनाचे स्वरूप नेमके कसे आहे, हे स्पष्ट करण्याचे प्रयत्न आधुनिक कालखंडात विशेषत्वाने होऊ लागले. त्यातूनच भाषाविज्ञान ही ज्ञानशाखाही विकसित होत गेली. बदलत्या काळानुसार भाषेत बदल होत गेल्याचे आपणास दिसून येते. वेगवेगळ्या जाती धर्माची भाषा वेगवेगळी असू शकते.

मनुष्य व त्याच्या भोवतीचे विश्व मिळून निसर्ग बनतो. या निसर्गामध्ये जीवनाच्या उत्कर्षाला अनुकूल असे बदल करून म्हणजेच निसर्गावर काही संस्कार करून मनुष्य आपली जीवनयात्रा चालवितो. तो केवळ बाह्य विश्वातील पदार्थांवर संस्कार करतो असे नव्हे, तर स्वत:चा देह, मन आणि बुद्धी यांच्यावरही संस्कार करून स्वत:त बदल घडवून आणतो. संस्कृती या शब्दात हे दोन्ही प्रकारचे बदल अभिप्रेत आहेत.[२]

Similar questions