Geography, asked by bikashloveguru7521, 1 month ago

जागतिक प्रमाण वेळ व आंतरराष्ट्रीय वार रेषा यातील फ़रक स्पष्ट करा

Answers

Answered by mellow19
10

Answer:

भारताची प्रमाण-वेळ ही वेळ जागतिक समन्वित वेळेपेक्षा ५ तास ३० मिनिटे पुढे आहे. संपूर्ण वर्षाकरीता हा फरक कायम असतो. ही वेळ प्रयागराज वेधशाळेत मोजली जाते. इतर देशांप्रमाणे ॠतूनुसार या वेळेत बदल केला जात नाही. पण १९४१-४५च्या दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी असा बदल करण्यात आला होता.

भारतीय प्रमाणवेळ

ही वेळ ८२.५° पूर्व या रेखांशावर असलेली स्थानिक वेळ आहे. प्रयागराज शहराजवळील मिर्झापूर गावाच्या पश्चिमेला हा रेखांश आहे. मिर्झापूर आणि इंग्लंडमधील रॉयल ऑब्झरव्हेटरी (ग्रीनविच) यांच्या वेळांत रेखांशानुसार साडेपाच तासाचा फरक आहे. राष्ट्रीय भौतिक प्रयोगशाळा दिल्ली येथे आधुनिक उपकरणांचा वापर करून अधिकृत वेळ मोजली जाते.

१८०० रेखावृत्तावरील एक काल्पनिक रेषा. १८०० रेखावृत्त पॅसिफिक महासागरातून जाते; ते ज्या ज्या ठिकाणी जमिनीवरून जाते ती ठिकाणे टाळून, सर्वस्वी समुद्रावरून आणि होता होई तो १८०० रेखावृत्ताच्या अनुरोधाने जाणारी, अशी ही रेषा मानलेली आहे. तिच्या पूर्वेला उत्तर व दक्षिण अमेरिका तर पश्चिमेला आशिया, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड हे प्रदेश येतात. ही रेषा ओलांडून जाताना वाराचा बदल करण्याची प्रथा आहे.

पूर्वेकडे म्हणजे आशियाकडून अमेरिकेकडे जाताना ही रेषा ओलांडली, तर चालू असेल त्याच्या मागचा वार धरतात आणि पश्चिमेकडे, अमेरिकेकडून आशियाकडे किंवा ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडकडे जाताना पुढचा वार धरतात. जहाजातून किंवा विमानातून एका बाजूच्या देशाकडून दुसऱ्या बाजूच्या देशाकडे जाताना वाराचा हा बदल करतात. या रेषेला ‘आंतरराष्ट्रीय वाररेषा’ असे म्हणतात.

हा फरक आहे

Mark me Brainliest plz!

Similar questions