जागतिक व्यापार संघटनेचे उद्देश सांगा.
Answers
Answer:
जागतिक व्यापार संघटना ही एक आंतरराष्ट्रीय संघटना जगामधील देशांदरम्यान होणाऱ्या आंतरराष्ट्रीय व्यापारावर देखरेखीचे काम करते. सदस्य राष्ट्रांमधील वाणिज्याला चालना देणे, तंट्यांचे निवारण करणे इत्यादी जागतिक व्यापार संघटनेची प्रमुख कामे आहेत.जकाती व व्यापारासंबंधीचा सर्वसाधारण करार विकसित देशांचे हितसंबंध टिकविणारा असल्यामुळे विकसनशील देशानी अनेकवेळा आंतरराष्ट्रीय व्यापारी संघटना स्थापन करण्याचा प्रयत्न केला , मात्र विकसित देशानी ते सर्व प्रयत्न हाणून पाडले . संयुक्त राष्ट्रसंघाने १९६३ मध्ये संस्थात्मक रचना उभारण्यासाठी एक समिती स्थापन केली होती .या समितीच्या सल्ल्यानुसार १९६४ मध्ये यु एन सी टी ए डी ( युनायटेड नेशन कॉन्फरन्स ऑन ट्रेड आणि डेव्हलपमेंट ) संस्था उभारण्यात आली उरुग्वे राउंडच्या मर्राकेश करारानुसार १ जानेवारी १९९५ ला जागतिक व्यापार संघटनेची स्थापना करण्यात आली 29 जुलै २०१६ अखेर भारतासह जगातील 164 देश ह्या संघटनेचे सदस्य होते .तर २५ देशांनी सदस्यत्व मिळवण्यासाठी उत्सुकता दाखवली आहे. सध्या १४ देश डब्ल्यू.टी.ओ.चे सदस्य किंवा निरिक्षक नाहीत.

आंतरराष्ट्रीय व्यापराच्या वाटाघाटींसाठी व्यासपीठ उपलब्ध करणे , आंतरराष्टीय व्यापार वृद्धीगंत करणे ,व्यापार विषयक मतभेद हाताळणे , राष्ट्रांच्या व्यापार धोरणांवर देखरेख ठेवणे , विकसनशील देशांसाठी तांत्रिक सहाय्य व प्रशिक्षण उपलब्ध करून देणे . अशी अनेक कार्ये या संघटनेद्वारे केली जातात .जकाती व व्यापारासंबंधीचा सर्वसाधारण करार हा तात्पुरत्या स्वरूपाचा होता , जागतिक व्यापार संघटना मात्र सदस्य देशानी मान्य केलेली कायमस्वरूपी संघटना आहे दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी , जागतिक बॅंक या संयुक्त राष्ट्रसंघाच्या संलग्न संस्था आहेत , जागतिक व्यापार संघटना मात्र एक स्वतंत्र संस्था आहे .