६) जिल्हा परिषदेचा
हा प्रशासकीय अधिकारी असती
Answers
Answer:
जिल्हा परिषदेची प्रशासकीय यंत्रणा
जिल्हा परिषदेमध्ये मतदारांनी निवडूण दिलेल्या लोकप्रतिनिधींना धोरण ठरविण्याचे व निर्णय घेण्याचे अधिकार असतात. या धोरणांची व निर्णयांची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा आवश्यक असते. या यंत्रणेचे प्रमुख मुख्य कार्यकारी अधिकारी हे असतात. जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतीच्या कार्यक्षम व दक्ष प्रशासनाची जबाबदारी सुद्धा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यावरच असते. त्यांची नियुक्ती राज्य सरकार भारतीय प्रशासन सेवेमधून करते. राज्य सरकार आवश्यकतेनुसार अतिरिक्त मुख्य
कार्यकारी अधिकारी तसेच एक किंवा अधिक उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांची नियुक्ती करते.
प्रशासकीय कामे विविध खात्यांचे खातेप्रमुख पहातात. हे सर्व खाते प्रमुख मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे नियंत्रणाखाली व पर्यवेक्षणाखाली कामे करतात. जिल्हा परिषदेची विविध खाते व खाते प्रमुख खालीलप्रमाणे असतात.
अ.क्र विभाग प्रमुख विभाग
१ मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) जिल्हा परिषदेचा प्रशासन प्रमुख
२ अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी -
३ उपमुख्य कार्यकारी अधिकारी सर्वसामान्य प्रशासन
४ उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत
५ उपमुख्य कार्यकारी अधिकारी बालकल्याण
६ मुख्य लेखापाल आणि फायनान्स अधिकारी अर्थविभाग
७ कृषि विकास अधिकारी कृषिविभाग
८ जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी पशुसंवर्धन विभाग
९ जिल्हा आरोग्य अधिकारी आरोग्य विभाग
१० कार्यकारी अभियंता
सार्वजनिक बांधकाम
११ कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा
१२ कार्यकारी अभियंता लघुपाटबंधारे
१३ जिल्हा शिक्षण अधिकारी (प्राथमिक ) शिक्षण विभाग
१४ जिल्हा शिक्षण अधिकारी (माध्यमिक) शिक्षण विभाग
१५ जिल्हा समाज कल्याण अधिकारी समाज कल्याण विभाग
१६ जिल्हा महिला व बाल कल्याण अधिकारी
समाज कल्याण विभाग
स्त्रोत - जिल्हा परिषद व पंचायत समिती (वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट )