Geography, asked by sumitdhadve88, 1 month ago

जालमर्गाचे प्रकार कोणते​

Answers

Answered by rawatnikita65
2

Answer:

जलवाहतूक : माल व उतारू यांची वाहतूक अनेक प्रकारची असते. प्रत्येक प्रकारचा विचार करताना तीन महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात : वाहन, प्रेरक शक्ती व मार्ग किंवा माध्यम. वाहन जेव्हा पाण्यातून किंवा पाण्याच्या पृष्ठभागावरून जाते, तेव्हा त्या वाहतुकीस जलवाहतूक असे म्हणतात. पृथ्वीच्या पृष्ठभागापैकी जवळजवळ ३/४ भाग पाण्याने व्यापला आहे, म्हणून जलवाहतूक ही जगभर आढळते.

वेगवेगळी वाहने पाण्यातून वाहतूक करताना सगळीकडे आढळतात. त्यासाठी प्रेरक शक्तीही अनेक प्रकारच्या वापरतात. वल्हे, शिडातील वारा, वाफेची किंवा डीझेल एंजिने आणि अणुशक्ती वाहनांना प्रेरणा देण्यासाठी उपयोगी पडतात. ज्या माध्यमातून वाहतूक होते, त्यावरूनच वाहतुकीची वर्गवारी केली जाते. नदीतील वाहतुकीस नदीवाहतूक व कालव्यांतील वाहतुकीस कालवे-वाहतुक म्हणतात. राष्ट्राच्या किनाऱ्यालगत होणाऱ्या वाहतुकीस किनारी वाहतूक आणि समुद्रातून होणाऱ्या वाहतुकीस सागरी वाहतूक म्हणतात.

वाहतुकीच्या इतर प्रकारांशी तुलना केल्यास जलवाहतुकीचे काही विशेष फायदे आहेत. जलवाहतुकीसाठी रेल्वे किंवा मोटर-वाहतुकीप्रमाणे मार्गबांधणीचा व मार्गदुरुस्तीचा खर्च करावा लागत नाही फक्त बंदरांमधील किंवा नदीतळाचा व कालवेतळाचा गाळ काढण्याचीच व्यवस्था करावी लागते. जलमार्गावरून वाहने चालविण्यास रेल्वे व मोटर-वाहतुकीप्रमाणे मोठ्या प्रमाणावर प्रेरक शक्तीची जरूरी भासत नाही व वाहनाच्या वजनाच्या कितीतरी पट वजनाचा माल वाहनातून दूरवर कमी खर्चात नेता येतो. जलवाहतुकीमुळे बऱ्याच दूरदूरच्या देशांशी संपर्क ठेवून दळणवळण वाढविता येते व त्यामुळे आर्थिक व्यवहारांचे क्षेत्र बरेच व्यापक बनते. शिवाय संरक्षणाच्या दृष्टीनेही जलवाहतुकीचे फार महत्त्व आहे. असे असले, तरी जलवाहतुकीस काही विशिष्ट अडचणींना तोंड द्यावे लागत असल्यामुळे तिच्यापासून काही तोटेही उद्‌भवतात. नदी-वाहतुकीचा मार्ग वळणावळणाचा असतो त्यामुळे प्रवासाचे अंतर वाढते. शिवाय सर्वच नद्या वाहतुकीस सोयीच्या नसतात. जलवाहतूक स्वस्त असली, तरी तिचा वेग बेताचाच असतो. वादळासारख्या नैसर्गिक आपत्तींना जलवाहतुकीस तोंड द्यावे लागते. शिवाय आरमारी आक्रमणामुळे काही राष्ट्रांवर संकटे येऊ शकतात.

उगम व विकास : नद्यांची खोरी वसाहतीसाठी उपयोगी असल्याने ऐतिहासिक दृष्ट्या मानवी संस्कृती नदीखोऱ्यांतच जन्माला आली असे मानतात. नदीकाठी राहणाऱ्या मानवास नदीप्रवाहाचा प्रवासमार्ग म्हणून उपयोग करण्याची कल्पना सुचली असणे स्वाभाविक आहे. लाकडाचे ओंडके, एकत्र बांधलेले बांबू, फळ्या किंवा जनावरांची कातडी यांसारख्या तरंगणाऱ्या पदार्थांचा हळूहळू वाहनासाठी उपयोग करण्यात आला असावा. त्यातूनच पुढे नौका, पडाव, बोटी व जहाजे यांसारखी वाहने तयार करून वापरण्याची युक्ती निरनिराळ्या लोकांना सुचली असावी. इतिहासात निरनिराळ्या संस्कृत्यांमध्ये जलप्रवासाचे उल्लेख सापडतात. ईजिप्शियन लोकांनी नाईल नदीतून व आर्यांनी सिंधू व गंगा या नद्यांतून प्रवास केले होते. मीगॅस्थीनीझ याने चंद्रगुप्त मौर्याच्या कारकीर्दीत गंगा व तिच्या उपनद्यांवर बरीच वाहतूक होत असल्याचा उल्लेख केला आहे.

Explanation:

please mark as brainliest

Similar questions