Art, asked by likefreefire1, 2 months ago

१) जेम्स मार्टिन्यू यांची धर्माविषयी व्याख्या स्पष्ट करा. BA/bcom​

Answers

Answered by like19
2

• जेम्स मार्टिन्यू यांची व्याख्या : धर्म म्हणजे एखाद्या चिरंतन ईश्वरावर विश्वास. हा ईश्वर म्हणजेच दिव्य आत्मा व संकल्प आहे की जो विश्वाचे नियंत्रण करतो व मानवाशी नैतिक संबंध प्रस्थापित करतो.

मार्टिन्यू यांच्या या व्याख्येत ठळक दोष हाच आहे की ती फक्त ईश्वरवादी धर्मांनाच लागू पडते आणि म्हणूनच ती अव्याप्त आहे. कारण सर्वच धर्म ईश्वरवादी नाहीत. उदाहरणार्थ, बौद्ध धर्म व जैन धर्मात ईश्वराचे अस्तित्व मान्य केलेले नाही. हिंदू धर्माच्या कक्षेत येणारेही अनेक तात्त्विक संप्रदाय आहेत की ज्यांत ईश्वराचे अस्तित्व मान्य केलेले नाही. उदाहरणार्थ, पूर्वमीमांसा आणि सांख्य हे संप्रदाय.

Similar questions