जून, सप्टेंबर व डिसेंबर या महिन्यांतील दिनमानांतील फरक स्पष्ट करा.
Answers
आतापर्यंत झालेल्या कृतीवर किंवा निरीक्षणावर आधारित चर्चा करा. त्यासाठी खालील प्रश्नांचा वापर करा. जून, सप्टेंबर आणि डिसेंबर महिन्यातील दिनमानाच्या नोंदीचा तक्ता वापरा.
●कोणत्या महिन्यात दिनमान साधारणपणे १२ तासांचे होते?
●असे घडण्यामागचे कारण काय असावे ?
●जून, सप्टेंबर व डिसेंबर या महिन्यांतील दिनमानांतील फरक स्पष्ट करा.
●काठीच्या सावलीची जागा कशामुळे बदलत असेल ?
●सूर्योदयाच्या व सूर्यास्ताच्यावेळी क्षितिजावरील परिस्थितीबाबत काय सांगता येईल ?
●खालीलपैकी कोणत्या घटकांशी सावलीच्या स्थानातील होणारा फरक व दिनमानातील फरक या बाबी जोडता येतील?
●पृथ्वीचे परिवलन.
●सूर्य व पृथ्वीमधील अंतर.
●पृथ्वीचे परिभ्रमण.
●पृथ्वीचा आस.
साधारणपणे जून, सप्टेंबर व डिसेंबर महिन्यातील दिनमानाच्या नोंदीवरून सर्वात मोठा दिवस, सर्वात लहान दिवस तसेच दिनमान व रात्रमान समान असणाऱ्या तारखा तुमच्या लक्षात आल्या असतील. दरवर्षी साधारणपणे याच तारखांना या स्थिती येत असतात. सावलीच्या प्रयोगावरून सूर्योदयाच्या स्थानात बदल झाल्याचे पाहिलेत. दिनमानात होणारा बदल तसेच सूर्योदयाच्या स्थानात होणारे बदल कशामुळे होतात याची माहिती मिळवूया.
<b>भौगोलिक<b> <b>स्पष्टीकरण<b>
●सूर्याचे भासमान भ्रमण: निरीक्षणातून असे लक्षात आले असेल, की सूर्योदयाचे स्थान दिवसागणिक बदलत जाते. पृथ्वीवरून जेव्हा आपण सूर्योदय पाहतो, तेव्हा सूर्य वर्षभरात उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडे सरकत असल्यासारखे दिसून येते. प्रत्यक्षात मात्र सूर्य कोठेही हलत नाही. सूर्य उगवण्याचे स्थान २१ जून ते २२ डिसेंबर या कालावधीत अधिकाधिक दक्षिणेकडे सरकते. हा काळ दक्षिणायन मानला जातो. याउलट २२ डिसेंबर ते २१ जून या कालावधीत उत्तरायण होते. या कालावधीत सूर्य अधिकाधिक उत्तरेकडे सरकतो. सूर्याच्या स्थानबदलाचे कारण पृथ्वी सूर्याभोवती फिरणे व पृथ्वीचा कललेला आस हे आहे. प्रत्यक्षात सूर्य फिरत नाही; परंतु, पृथ्वीवरून पाहताना आपल्याला तो फिरल्यासारखा दिसतो, म्हणून सूर्याच्या या भ्रमणाला 'भासमान भ्रमण' असे म्हणतात. पृथ्वीवर होणारे ऋतू हे केवळ उत्तर व दक्षिण गोलार्धांच्या संदर्भात घडतात.
Explanation:
सूर्य २१ मार्च व २२ किंवा २३ सप्टेंबर या दिवशी खगोलीय विषुववृत्तावर असतो. त्यामुळे पृथ्वीवरील कोणत्याही ठिकाणी बारा तासांचा दिवस व बारा तासांची रात्र असते. म्हणून या दिवसांना विषुव दिन असे म्हणले जाते. ... ज्यावेळी कोणताही गोलार्ध सूर्याकडे कललेला नसतो तेव्हा पृथ्वीवर दिवस-रात्र समान असते.