' ज्ञानदेवें रचिला पाया । उभारिले देवालया । ' या ओळींमधील विचारसौंदर्य स्पष्ट करा .
Answers
उत्तर :-
'संतकृपा झाली' या अभंगात संत बहिणाबाई वारकरी संप्रादयाच्या उभारणीतील संत ज्ञानेश्वरांचे योगदान वर्णन केले आहे.
संताच्या कृपेमुळे वारकरी संप्रदयारूपी इमारतीची जडणघडण झाली. संत ज्ञानेश्वरांनी या संप्रदायाला वैचारिक, अध्यात्मिक व तात्विक बैठक दिली. समाजातील सर्व घटकांना समतेने वागण्याची शिकवण देऊन एकाच छताखाली आणले. 'ज्ञानेश्वरी', 'हरिपाठ', 'अमृतानुभव' या ग्रंथांची रचना करून ज्ञानाची कवाडे सर्वदूर खुली केली. सर्वसामान्य लोकांना भक्ती करण्याचा, ज्ञान मिळवायचा अधिकार मिळवून दिला. अशाप्रकारे, ज्ञानेश्वरांनी या वारकरी संप्रदायारूपी देवालयाची भक्कम पायाभरणी केली. या बळकट पाया मुळेच संपूर्ण देवालयाचा डोलारा त्याच्यावर उभारला गेला, असे प्रस्तुत ओळीद्वारे बहिणाबाई सांगत आहेत.
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
अधिक जाणून घ्या brainly वर :
भावार्थाधारित.
(१) ‘तुका झालासे कळस । भजन करा सावकाश ।।' या ओळीचा भावार्थ स्पष्ट करा.
https://brainly.in/question/11552233