*(२) 'ज्ञानदेवे रचिला पाया। उभारिले देवालया।।' या ओळींचा अर्थ स्पष्ट करा.
Answers
Answered by
12
Answer:
Explanation:
'संतकृपा झाली' या अभंगात संत बहिणाबाईंनी वारकरी संप्रदायाच्या उभारणीतील संत ज्ञानेश्वरांचे योगदान वर्णन केले आहे.
संतांच्या कृपेमुळे वारकरी संप्रदायरूपी इमारतीची जडणघडण झाली. संत ज्ञानेश्वरांनी या संप्रदायाला वैचारिक, आध्यात्मिक व तात्त्विक बैठक दिली. समाजातील सर्व घटकांना समतेने वागण्याची शिकवण देऊन एकाच छताखाली आणले. 'ज्ञानेश्वरी', 'हरिपाठ', 'अमृतानुभव' या ग्रंथांची रचना करून ज्ञानाची कवाडे सर्वदूर खुली केली. सर्वसामान्य लोकांना भक्ती करण्याचा, ज्ञान घेण्याचा अधिकार मिळवून दिला. अशाप्रकारे, ज्ञानेश्वरांनी या वारकरी संप्रदायरूपी देवालयाची भक्कम पायाभरणी केली. या बळकट पायामुळेच संपूर्ण देवालयाचा डोलारा त्याच्यावर उभारला गेला, असे प्रस्तुत ओळीद्वारे बहिणाबाई सांगत आहेत.
Similar questions