जा
समाना
52) विधेयकाचे कायद्यात रूपांतर होण्यापूर्वी त्याचे किती वेळा वाचन होते ?
1) 2 वेळा
2) 3 वेळा
3) 4 वेळा
4)5 वेळा
Answers
Answer: कायदेनिर्मितीसाठी सादर केलेल्या मसुद्याला 'विधेयक' असे म्हणतात.
विधेयकाचे कायद्यात रूपांतर होण्यापूर्वी त्याचे एकूण तीन वेळा वाचन केले जाते.
* पहिले वाचन- विधेयक ज्या खात्याशी संबंधित आहे, त्या संबंधित खात्याचा मंत्री किंवा संसद सदस्य विधेयक सादर करतो व विधेयक मांडताना त्याचे स्वरूप थोडक्यात स्पष्ट करतो.
* दुसरे वाचन :- दुसऱ्या वाचनाचे दोन टप्पे असतात. पहिल्या टप्प्यात विधेयकातील उद्दिष्टांवर चर्चा होते. दुसऱ्या टप्प्यात विधेयकावर कलमवार चर्चा होते. यावर सदस्यही दुरूस्त्या सुचवू शकतात. त्यानंतर त्यावर सभागृहात मतदान घेतले जाते. अशा तऱ्हेने विधेयकाचे दुसरे वाचन पूर्ण होते.
* तिसरे वाचन :- तिसऱ्या वाचनाच्या वेळी विधेयकावर पुन्हा थोडक्यात चर्चा होते. त्यानंतर विधेयक मंजूर करण्याच्या ठरावावर मतदान होते. विधेयकास आवश्यक असलेल्या बहुमताची मंजुरी मिळाली तर संबंधित सभागृहाने विधेयक संमत म्हणजे मंजूर केले असे मानले जाते आणि मग विधेयक दुसऱ्या सभागृहाकडे संमतीसाठी पाठवले जाते.
Explanation: