जात मंजे एक विस्तारित कुटुंबा होए
Answers
Answer:
कुटुंब म्हणजे परस्परांशी नाती असलेल्या माणसांचा समूह. माणसांमधील नाती ही जन्मावरून, विवाहावरून अथवा दत्तक घेण्यावरून निर्माण होतात. कुटुंबसंस्था एकत्र अथवा विभक्त अशी दोन्ही प्रकारची असू शकते. विभक्त कुटुंबसंस्थेत आई-वडील, पती-पत्नी, मुलगा-मुलगी असे प्राथमिक घटक असतात.
पुरुष केंद्रस्थानी मानून काढलेल्या कुटुंबवृक्षातील नात्यांची नावे
एकत्र कुटुंबपद्धतीत इतर दुय्यम नातेसंबंधांचा अंतर्भाव होतो. साधारणतः पुरुष (वडील) हा कुटुंबाचा प्रमुख असतो. एकत्र कुटुंब म्हणजे साक्षात स्वर्गच म्हणावा लागेल.
कुटुंब प्रकार- कुटुंबसंस्था ही सार्वभौम संस्था असली तरी समाजपरत्वे तिचे स्वरूप विविध असल्याचे आढळून येते. समाजामध्ये ज्या प्रकारची कुटुंबपद्धति प्रचलित असते त्या पद्धतीशी सुसंगत अशी सांस्कृतिक लक्षणे, स्थायीभाव, कल्पना, इत्यादी बाबी कुटुंबात विकसित होत असतात. १. आप्तसंबंधावर आधारित कुटुंब प्रकार-
अ. प्राथमिक कुटुंब किंवा केंद्र कुटुंब-
केंद्र कुटुंब हे सर्व समाजात आढळून येते. या कुटुंबामध्ये प्रामुख्याने पत्नी पती व त्यांची अविवाहित किंवा दत्तक मुले यांचाच समावेश होतो. म्हणजे पती पत्नी, माता पिता, माता मुलगा, बहीण भाऊ आणि बहिणी बहिणी या नातेसंबंधांच्या व्यक्तींंचा केंद्र कुटुंबात समावेश असतो.
ब. विस्तारित कुटुंब-
विस्तारित कुटुंंबात रक्तसंबंधी संतानोत्पतीचा आणि विवाहासंबंधामुळे झालेल्या अशा सर्वच व्यक्तींचा समावेश असतो. या समाजात प्रामुख्याने शेती व्यवसाय हा प्रमुख व्यवसाय समजला जातो. त्या समाजात विस्तृत कुटुंब आढळून येते. या कुटुंबामधील सदस्यांची संख्या खूप मोठी असते.
२. विवाह प्रकारावर आधारित कुटुंब प्रकार-
यात विवाहातील स्त्री-पुरुषांच्या जोडीदारांची संख्या समान नसल्याने पती-पत्नीच्या संख्येत कमी अधिक प्रमाण असते.
याचे प्रकार :
अ. एकविवाही कुटुंब- या विवाह प्रकाराध्ये पती व पत्नीची विवाह समयी संख्या एकच असते. म्हणजे एक पुरुष व एक स्त्री यांच्या वैवाहिक संबंधाद्वारे जे कुटुंब निर्माण होते त्यास एकविवाही कुटुंब असे म्हणतात. पतीपत्नी जिवंत असेपर्यंत कोणा एकाला दुसरा विवाह करता येत नाही.
ब. बहुपती कुटुंब-
अनेक पुरुष जेव्हा एकाच स्त्रीबरोबर विवाह करुन कुटुंब निर्माण करतात तेव्हा त्या कुटुंबास बहुपती कुटुंब असे म्हणतात. या कुटुंबातील सर्वच सदस्य एकाच घरी राहतात. पत्नी सर्वांची सामाईक बाब असते. स्त्रीचे पती हे परस्परांचे भाऊ असतात. हे सर्व जण एकाच घरात राहतात.
क. बहुपत्नी कुटुंब- या कुटुंब प्रकारात एक पुरुष अनेक स्त्रियांबरोबर विवाह करून कुटुंब निर्माण करतात.
३. वंश व अधिसत्ता यांवर आधारित कुटुंब प्रकार- यामध्ये दोन प्रकार आहेत-
१. मातृसत्ताक कुटुंब- ज्या कुटुंबाची अधिसत्ता स्त्रीकडे असते व वंशही तिच्याच नावाने चालतो त्या कुटुंबाला मातृसत्ताक कुटुंब म्हणतात.
२. पितृवंशीय कुटुंब- ज्या कुटुंबात अधिसत्ता पुरुषांकडे असते व वंश ही त्याच्याच नावाने चालतो त्या कुटुंबाला पितृवंशीय कुटुंब म्हणतात.
मातृसत्ताक कुटुंब पद्धती-मातृसत्ताक कुटुंब पद्धतीमध्ये स्त्रीचे प्रस्थापित वर्चस्व असते कुटुंबाची वंशावळ तिच्याच नावाने चालते. कुटुंबाची ओळख तिच्याच नावाने किंवा गोत्राने होत असते. कुटुंबाची मालकीची संपती मुलांना न मिळता मुलींना मिळते. विवाह झाला की पती हा पत्नीच्या घरी अधूनमधून राहायला जातो. सर्व कारभार पुरुषांवर नसून स्त्रीच्या भावावर आणि वडिलांवर असतो. हे कुटुंब रक्तसंबंधांवर अधिक आधारलेले असते.
पितृसत्ताक कुटुंब - बहुतांशी जगात पितृसत्ताक कुटुंब पद्धती प्रचलित आहे. या कुटुंब पद्धतीमध्ये सर्व सत्ता पुरुषाकडे असते. विवाहानंतर पत्नी पतीच्या घरी जाऊन राहते. त्यामुळे पत्नीला त्या कुटुंबाचे सदस्यत्व मिळते. तसेच तिला पतीच्या गोत्रातील एक सदस्य म्हणून मान्यता मिळते. यामध्ये वारसा हक्क मुलास मिळतो. कोणतेही आर्थिक, सामाजिक, धार्मिक कार्यक्रम असताना पतीला प्राधान्य दिले जाते. सर्व आर्थिक व्यवहार जास्त करून पुरुष पाहतात. पित्याच्या मृत्यूनंतर सर्व व्यवहार आपोआप मुलाकडे येतात. विवाहा नंतर वधू वराच्या घरी जाते. कुटुंबामध्ये स्त्रीचा दर्जा दुय्यम असतो. तिचा दरारा असलाच तर सासू या नात्याने सुनेवर असतो. समाजातील लोकरूढीप्रमाणे या प्रकारच्या कुटुंब पद्धतीमध्ये स्त्री-पुरुष यांच्या कामाची वाटणी झालेली असते.
कबीली परिवार :
जनजातींमध्ये असलेली ही पद्धत सामाजिक विकासक्रमातल्या आदिम अवस्थेच्या जवळची आहे. हिच्यात विवाहाचे आणि कुटुंबाचे जवळपास सर्व प्रकार मिळतात. या विभिन्न प्रकारांमध्ये विकासक्रमाच्या दृष्टीने पूर्वापर क्रम निर्धारित करणे शक्य नाही..