India Languages, asked by pankajkunwar11136, 5 months ago

२.
जेव्हा मी आजारी पडलो माझ्या मित्राने माझी कशी मदत
केली ते लिहा.​

Answers

Answered by shrutibhale
0

Explanation:

w11 १/१ पृ. १०-१३

आजारी मित्राला कशी मदत कराल?

खूप आजारी असलेल्या तुमच्या एखाद्या मित्राला तुम्ही भेटायला जाता पण तिथे गेल्यावर काय बोलायचे हेच तुम्हाला सुचत नाही, असे कधी तुमच्या बाबतीत झाले आहे का? जर होय, तर निराश होऊ नका. तुम्ही या परिस्थितीवर मात करू शकता. ती कशी? याबाबतीत खरे तर असे काही नियम वगैरे नाहीत. आणि संस्कृती-संस्कृतीत फरक असू शकतो. लोकांच्या व्यक्‍तिमत्त्वातही फरक असू शकतो. त्यामुळे, एखाद्या आजारी व्यक्‍तीला एक गोष्ट बरी वाटेल, पण तीच गोष्ट कदाचित दुसऱ्‍या आजारी व्यक्‍तीला तितकीशी आवडणार नाही. शिवाय, आजारी व्यक्‍तीची परिस्थिती, तिच्या भावना यांत, दररोज काही न्‌ काही फरक असू शकेल.

यास्तव, तुम्ही स्वतःला आजारी व्यक्‍तीच्या ठिकाणी ठेवून, तिला किंवा त्याला तुमच्याकडून नेमकी कोणत्या प्रकारची मदत हवी आहे हे पाहणे महत्त्वाचे आहे

Similar questions