ज्वालामुखी म्हणजे काय?
Answers
Answer:
ज्वालामुखी म्हणजे असा डोंगर ज्यातून लाव्हारस बाहेर पडतो.
Explanation:
१. पृथ्वीच्या अंतरंगात अनेक पदार्थ आहेत.
२. त्यांपैकी काही पदार्थ हे तप्त आहेत. या पदार्थांचे तापमान सामान्य तापमानापेक्षा प्रचंड असते.
३. पृथ्वीच्या अंतरंगात अनेक प्रकारच्या हालचाली सुरू असतात.
४. या हालचालींमुळे पृथ्वीच्या अंतरंगातील ते तप्त पदार्थ बाहेर पडतात.
५. जमीनीला तडे जाऊन भेगा पडतात.
६. असे तप्त द्रव पृथ्वीच्या अंतरंगातून पृथ्वीवर येण्याची प्रक्रिया म्हणजे ज्वालामुखीचा उद्रेक होय.
७. ज्वालामुखी या शब्दाचा अर्थ पाहता, ज्याच्या मुखातून ज्वाळा ( तप्त पदार्थ ) बाहेर पडतात, तो ज्वालामुखी होय.
अधिक माहिती:
१) ज्वालामुखीचे प्रकार: ( उद्रेकानुसार )
१. केंद्रीय ज्वालामुखी:
जेव्हा एखाद्या ज्वालामुखीचा उद्रेक होतो आणि तप्त पदार्थ हे फक्त एकाच मार्गाने बाहेर पडतात, तेव्हा त्या ज्वालामुखीला केंद्रीय म्हणजेच एक ठिकाणी केंद्रीत झालेला ज्वालामुखी म्हणतात.
२. भेगीय ज्वालामुखी:
जेव्हा एखाद्या ज्वालामुखीचा उद्रेक होतो आणि तप्त पदार्थ हे अनेक मार्गांतून बाहेर पडतात, तेव्हा त्या ज्वालामुखीला भेगीय म्हणजेच जमीनीला भेगा निर्माण करणारा ज्वालामुखी म्हणतात.
२) ज्वालामुखीचे प्रकार: ( उद्रेकाच्या कालावधीनुसार )
१. जागृत ज्वालामुखी:
ज्या ज्वालामुखीतून नेहमीच तप्त पदार्थ बाहेर पडतात, त्या ज्वालामुखीला जागृत ज्वालामुखी म्हणतात.
२. सुप्त / निद्रीस्त ज्वालामुखी:
ज्या ज्वालामुखीतून कधीकधी तप्त पदार्थ बाहेर पडतात, त्या ज्वालामुखीला सुप्त ज्वालामुखी म्हणतात.
३. मृत ज्वालामुखी:
ज्या ज्वालामुखीतून खूप काळापासून कोणतेही तप्त पदार्थ बाहेर पडले नाहीत, त्या ज्वालामुखीला मृत ज्वालामुखी म्हणतात.
Answer:
- ज्वालामुखी म्हणजे असा डोंगर ज्यातून लावारस बाहेर पडतो