जैव विविधतेचे संवधरन
Answers
Answered by
2
जगातील काही अतिसंवेदनशील क्षेत्रामध्ये पश्चिम घाटातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा समावेश होतो. चांदोली राष्ट्रीय उद्यान आणि कोयना अभयारण्याचा परिसर मिळून सह्याद्री व्याघ्र प्रकल्प निर्माण झाला आहे. त्यामुळे येथील जैवविविधतेला संरक्षण प्राप्त होण्यास मदत झाली आहे. संपूर्ण पश्चिम घाटच महत्वपूर्ण असून सध्या अनेक समस्या येथील पर्यावरणाला आणि जैवविविधतेला भेडसावत आहेत. वाघाला केंद्रस्थानी ठेवून येथील संपूर्ण जैवविविधतेचे संवर्धन आणि संरक्षण होणे ही काळाची गरज आहे. अन्यथा जागतिक तापमान वाढ, जंगल तोड, अवैध खाणकाम, शिकार, जंगलातून होणारे घाट रस्ते याचा दुरगामी परिणाम पुढच्या पिढीला भोगावा लागण्याची शक्यता आहे.
आधुनिकीकरणाच्या युगात नैसर्गिक साधनसंपत्तीवर मोठ्या प्रमाणावर संकट येत आहे. शहरीकरण, वाढत जाणारी लोकसंख्या, जंगलाची होत असलेली तोड, नष्ट होत चाललेले वन्यजीवांचे अधिवास, जैविक सपंत्तीचा अमर्याद वापर यामुळे प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे जैविक उत्पादने व साधन संपत्तीवर विपरीत परिणाम होत आहे. दि.22 मे हा आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस साजरा होत आहे. त्यानिमित्ताने जैवविविधता संवर्धनासाठी लोकांचा सक्रीय सहभाग महत्वाचा आहे. जैवविविधता मानवाचे जीवन आहे. जैवविविधतेशिवाय काहीही शक्य नाही. पृथ्वीवरील प्रत्येक गोष्टीत जैवविविधता आहे. अनेक प्रजाती एक दुसर्यावर अवलंबून आहेत. त्यामुळे जैवविविधता संरक्षण आणि संवर्धन प्रत्येकाचे कर्तव्य आहे.
महाराष्ट्रातील एक महत्वपूर्ण आणि जैवविविधतेचे संपन्न अभयारण्य म्हणजे कोयना अभयारण्य आहे. यामध्ये पश्चिम घाटातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा समावेश होतो. कोयना अभयारण्यातील वनस्पती, पक्षी. प्राणी व इतर जैवविविधता ही चांदोली राष्ट्रीय उद्यानातील जैवविविधतेने सारखीच असली तरी देखील येथील जैवविविधतेचा सखोल अभ्यास होणे गरजेचे आहे. अभयारण्याच्या कोकण कड्यावरील बाजूस नामशेष होण्याच्या मार्गावर असणार्या गिधाडांचे अस्तित्व आजही आढळून येत आहे.
संवेदनशील व जैवविविधतेने समृध्द सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये अद्वितीय वनस्पती विविधता आहे. निमसदाहरीत, अर्धपानझडी व झुडपी जंगल प्रकारामध्ये काही सदाहरीत जंगलाच्या निर्देशांक वनस्पती येथे आढळतात. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील बफर झोनमध्ये महाराष्ट्राचे व्हॅली ऑफ फ्लॉवर म्हणून ओेळखल्या जाणार्या कास पठारावर 850 पेक्षा जास्त वनस्पतींचे प्रकार नोंदवले गेले आहेत. 156 फॅमिली, 680 जिनेरा, 1452 जाती आणि 450 पेक्षा जास्त औषधी वनस्पती या संपूर्ण वनस्पती कोयना व कासमध्ये आढळतात. आय.यु.सी.एन.च्या रेड डेटा बुकामध्ये अस्तित्व धोक्यात आलेल्या वनस्पतीच्या पुस्तकातील 624 जातीपैकी 38 जातींच्या वनस्पती कासच्या पठारावर सापडतात. त्यामुळे या जैवविविधततेचे सवंर्धन होणे ही काळाची गरज आहे त्यादृष्टीने वनविभागासह सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील अधिकारी प्रयत्न करताना दिसत आहेत.
1 हजार 496 ग्रामस्तरीय समित्या कागदावर?
सन 2008 चा महाराष्ट्र राज्य जैविक विविधता नियमनुसार जिल्ह्यात 1 हजार 496 ग्रामपंचायतीमध्ये ग्रामस्तरीय वनहक्क समित्यांची स्थापना करण्यात आली असली तरी त्या कागदावरच आहे. या समित्याकडून कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही त्यामुळे जिल्ह्यातील जैवविविधता टिकणार का? असा सवाल पर्यावरणप्रेमीमधून उपस्थित होत आहे.जिल्ह्यातील वाळूतस्कर, खडी क्रशर चालकांच्या मनमानी कारभारामुळे जिल्ह्यातील अनेक गावातील जैवविविधता धोक्यात आली आहे. दि. 10 डिसेंबर 2008 साली महाराष्ट्र राज्य जैविक विविधता नियम राज्यभरात लागू करण्यात आला होता.

Similar questions