India Languages, asked by pranjalhadkar, 3 months ago

जीवनात हास्याचे महत्त्व​

Answers

Answered by parth19545
0

Answer:

जीवनात हसण्याचे महत्व असल्याचे महत्त्व भरपूर आहे कारण जेव्हा आपण हसतो तेव्हा आपल्याला आनंद मिळतो तसेच जेव्हा आपण हसत असतो तेव्हा आपल्या अंगात लवकरात लवकर बाहेर जाऊ शकते असे म्हटले जाते की हसल्याने आयुष्य वाढते इत्यादी भरपूर अशा गोष्टी आपल्या शरीरात असल्याने होतात हसत रहा.

I hope this will help you

Answered by lohitjinaga
0

Answer:

जगात कुठेही नाही एवढा हास्याचा प्रचंड साठा तुमच्या आमच्या जीवनात आणि सभोवताली असतो;परंतु तो बघण्याची दृष्टी आपणाजवळ नाही ती निर्माण झाल्यास आपले जीवन एकदम बदलून जाईल.

आता हसायला कुणाला आवडत नाही ? पण इथे वेळ कोणाकडे आहे ? चार क्षण निवांत मिळतील तर शपथ.सगळ्यांचेच जीवन धावपळीचे झाले आहे.इथे हसायचे म्हंटले तरी लोकांच्या जीवावर येते काहीना तर हसायचे म्हंटले तर रडायलाच येते!

मानवात जे नाही त्याची भरपाई म्हणून देवाने कल्पनाशक्ती दिली आणि जे आहे ते सुखमय ह्वावे यासाठी विनोदबुद्धी दिली.

जीवनात सदा सुखी व आनंदी असावे असे वाटणे स्वाभाविक आहे परंतु वास्तवात तसे होत नाही आणि वास्तव सुसह्य फक्त 'विनोद'च करू शकतो.कारण हसल्याने निर्भेळ आनंद मिळतो आणि मनाचे आरोग्य उत्तम राहते.ताणतणाव कमी करण्याचे कधीही आणि कुठेही उपयोगी पडेल असे साधन म्हणजे विनोद!

विनोदाला कोणी बाप नसतो पण ते सर्व औरस असतात.काही विनोद सहजस्फुर्तीचे आणि काही समयसुचकतेचे द्योतक असतात.अगदी एका शब्दानेही हास्याचे फुलोरे उडताना आपण कित्येकदा अनुभवले असेल.किंवा एखाद्या विनोदाला आपण 'क्या टायमिंग है बॉस' अशी कॉम्प्लिमेंट देऊनहि गेलेलो असेल.

काल्पनिक विनोद असतात ते अधिकतर प्रचारात असतात आणि ते प्रवाही होऊन जातात मात्र त्यांच्या उपत्तीकाराची काही नोंद राहत नाही. काही विनोद सूचक पण चावट असतात.ते सांगनार्याच्या तोंडापेक्षा ऐकणार्याच्या कानात अधिक फुलतात.

ज्यांना विनोदबुद्धी नाही त्यांच्यात ती उत्पन्न करणे आणि ज्यांच्याकडे थोड्याप्रमाणात आहे त्याची वाढ करणे असे काम काही विनोदवीर करत असतात.'विनोद' हे अमर असे साहित्य आहे त्यामुळे ते सर्वांच्या मालकीचे आहे.

क्रिकेटमध्ये कितीही चांगला बॉल टाकला व तो खेळपट्टीच्या बाहेर पडला व दिशाहीन पडलातर त्याला वाईड बॉल म्हणतात.त्याचप्रमाणे स्थळ ,काळ व वेळ न पाहता केलेला कोणताही विनोद कितीही चांगला असला तरी दाद मिळवू शकत नाही कारण त्याला 'वाईड जोक' म्हणतात.

काही विनोद सोज्वळ हि असतात तर काही विनोद एखाद्या व्यक्तीच्या व्यंगावर केलेले असतात त्यावर लोक हसले तरी त्याला चांगले विनोद म्हणता येणार नाही.

Explanation:

please mark as brainly BRAINLIEST mark...

Similar questions