जीवनात कोणाचे पालन करायचे आहे?
Answers
Answer:
महत्वपूर्ण संदेश : वयाच्या पहिल्या 8 वर्षांमध्ये घेण्यानत आलेली काळजी व संगोपन, विशेषत: पहिल्या 3 वर्षांतील, अत्यंत महत्वाचे असते आणि त्याच्या किंवा तिच्या आयुष्यावर ह्याचा प्रभाव पडतो.
पहिल्या वर्षात घेतलेल्या काळजीने व मिळालेल्या प्रेमाने मूल भरभरून वाढते. त्याच्या वाढीसाठी व भावनिक विकासासाठी त्याला प्रेमाने जवळ घेणे तसेच त्याच्याशी बोलणे फार महत्वाचे असते. आईच्या कुशीत असल्याने व गरजेनुसार स्तनपान मिळाल्यावर बाळाला सुरक्षित वाटते.
मुले व मुली यांच्याय शारीरिक, भावनिक, मानसिक व सामाजिक गरजा सारख्याच असतात, शिवाय दोघांची शिकण्याची क्षमतादेखील सारखीच असते. मुले व मुली दोघांना ही प्रेम व कौतुकाची सारखीच गरज असते.
आपली एखादी गरज सांगण्यासाठी रडणे ही मुलांची एक पध्दत आहे. अशावेळी त्यास जवळ घेऊन प्रेमाने बोलून त्याचे सांत्वन केल्यास विश्वासाचे व सुरक्षिततेचे नाते निर्माण होते.
फिकुटलेली, कुपोषित किंवा बहुतेक आजारी मुले नंतर घाबरट आणि उदास बनतात व इतर सर्वसामान्य मुलांमध्ये दिसणारा खेळण्याचा, शिकण्याचा व इतरांशी बोलण्याचा उत्साह त्यांच्यात आढळत नाही.खाण्यासाठीदेखील त्यांना विशिष्ट पद्धतीने प्रवृत्त करावे लागते.
मुलांमध्ये दिसणार्या भावना वास्तविक व सशक्ता असतात. एखादी गोष्ट त्यांच्या मनाप्रमाणे झाली नाही तर त्यांना विलक्षण दुःख होते. मुले साधारणापणे अंधाराला किंवा अनोळखी व्यक्तींना घाबरतात. मुलांच्या मताची किंवा भावनांची टिंगल केली, दुर्लक्ष केले किंवा त्याबद्दल त्यांना शिक्षा केली तर मोठेपणी अशी मुले लाजाळू किंवा घाबरट बनतात तसेच त्यांना आपल्या भावना नीटपणे व्यक्त करता येत नाहीत. मुलांच्या भावनांचा उद्रेक झाल्यास पालकांनी किंवा संगोपनकर्त्यांनी संयमाने व सहानुभूतीने परिस्थिती हाताळल्यास अशी मुले आनंदी बनतात व त्यांची मनस्थिती संतुलित राहते.
plz mark it brianlist