India Languages, asked by TransitionState, 11 months ago

जीवनात खेळाचे महत्त्व निबंध, भाषण, लेख मराठीमध्ये

Answers

Answered by sksohilchoudhary
4

Explanation:

shshshhshshdhdhdhdhdhhsshshshshshs

Answered by ItsShree44
3

Answer:

आज भारतीयांच्या जीवनात खेळांना महत्त्व आले आहे. आजकाल खेळाविषयीचा दृष्टिकोन थोडा थोडा बदलू लागला आहे; पण काही वर्षांपूर्वी खेळण्यात वेळ घालवणारे मूल हे अवलक्षणी समजले जायचे. इतकेच काय, एखादयाने 'खेळ' हे आपले जीवनध्येय (करिअर) करायचे ठरवले, तर त्याला 'भिकेचे डोहाळे' लागले असे मानले जायचे. आज खेळातूनही पैसा मिळू शकतो, हे पाहून काही लोक तो आपल्या करिअरचा भाग करतात; पण त्याचबरोबर खेळाचे इतर फायदेही आज आपणाला उमगले आहेत. निकोप शरीरातच निकोप मन असू शकते, हे उमगल्यावर शरीर निकोप, सुदृढ ठेवण्यासाठी माणसे धडपडू लागली आणि निकोप शरीराचा एक मार्ग खेळाच्या पटांगणातून जातो, हे उमगल्यावर त्यांना खेळ हवेहवेसे वाटू लागले.

लहानपणी आपला बराचसा वेळ हा खेळण्यात जातो; पण लहानपणचे बहुतेक खेळ हे गमतीखातर खेळले जातात. त्यांत कोणतीही शिस्त नसते. बालपण हे फुलपाखरासारखे असते. जेव्हा बालपण संपते, शैशवही ओलांडले जाते आणि कुमारावस्था प्राप्त होते, तेव्हा शिस्तीची आवश्यकता निर्माण होते. जीवनातील सर्वच क्षेत्रांत शिस्त अनिवार्य आहे, तशी ती खेळांतही आवश्यक असते. खेळांनी व्यायाम होतो, शरीर बळकट होते; पण खेळातील शिस्त जीवनालाही वळण देते.

क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. तेथे आपल्या एकट्याचा विचार करून चालत नाही, संपूर्ण संघाचा विचार करावा लागतो. खेळामुळे मनोरंजन होते व मनाला उत्साह मिळतो. दोन-चार तास अभ्यास केल्यावर कंटाळा येतो. त्यानंतर थोडा वेळ खेळल्यावर कंटाळा पळून जातो आणि अभ्यासासाठी पुन्हा उत्साह येतो. खेळात मनाची एकाग्रता साधता येते; चापल्य येते.

खेळांचाही अभ्यास करावा लागतो, खेळालाही सराव लागतो आणि खेळासाठीही उत्तम मार्गदर्शक गुरू असावा लागतो. खेळ म्हटला की यश आणि अपयश आलेच. कधी हार होणार, कधी जीत होणार; पण हारही हसत स्वीकारता आली पाहिजे. हरणारा खेळाडू जिंकलेल्या खेळाडूचे प्रथम अभिनंदन करतो. खेळातून येणारी ही खिलाडूवृत्ती जीवनात फार उपयोगी पडते. प्रत्येकाला आपल्या जीवनात केव्हा ना केव्हा संकटाला तोंड दयावे लागते. कधी हार पत्करावी लागते. अशा वेळी खिलाडूवृत्ती असेल तरच आपण पुढे जातो. अपयशाने खचून जाणाऱ्याच्या हातून काहीच घडत नाही. जशी हार, तशीच जीत ! हार झाल्याने खचून जाऊ नका. तसेच, जीत झाल्याने फुगून जाऊ नका, असे सच्चा खेळाडू सांगतो. खेळातील जय ज्याप्रमाणे संयमाने स्वीकारावा, तसाच जीवनातील विजयही विनम्रतेने स्वीकारावा.

खेळात हार-जीत असली तरी खेळ खेळले जातात ते मैत्रीसाठी! ऑलिम्पिक, विम्बल्डन, एशियाड आदी विविध खेळांच्या जागतिक स्पर्धा वर्षभर खेळल्या जातात, एकमेकांचे कौतुक करण्यासाठी, स्नेहाचा हात पुढे करण्यासाठी! खेळांमुळेच आपली उत्साही वृत्ती टिकून राहते.

Similar questions