जीवनातील खेळाचे महत्त्व तुमच्या शब्दात लिहा . स्वमत
Answers
Answer:
KOLKATA: A moderate earthquake shook parts of West Bengal on Saturday evening. Temors were felt in Kolkata and parts of south Bengal around 4.30 PM. According to the Meteorological department, an earthquake of 3.6 magnitude hit parts of West Bengal, tremors of which were felt in Howrah district and other areas.Aug 3, 2019
Answer:
निरोगी शरीरात निरोगी मन वास करते. चांगले आरोग्य आपणास शारिरीक खेळामुळे प्राप्त होते. नियमित खेळामुळे
शरीर निरोगी, सद्रुढ तसेच तंदुरुस्त बनते. खेळामुळे शारीरिक तसेच मानसिक विकास चांगल्या प्रकारे होतो. खेळामुळे प्रत्येक अवयवाची हालचाल होवून ते अधिक चांगले कार्य करततात.
आपल्याला अगदी बालपणापासून ते व्ूद्ध ावस्थेपर्यत खेळ महत्त्वाचे ठरतात. शालेय जीवनातील क्रिडा स्पर्धा, क्रिडा महोत्सव, शारीरिक शिक्षणाचे तास इ. यातून विद्यार्थ्यांमद्धे अनेक चांगल्या गुणांची वाढ होते. जसे कोणत्याही खेळाचा संघनायक बनल्याने भावी जीवनात समाजाचे नेतृत्व चांगल्या प्रकारे करता येते. आपल्या मनामध्ये जिद्द, चिकाटी, सहकार्यव्ूत्ती, समुहभावना इ. गुणांची वाढ होते. आज शालेय पातळीपासून ते ऑलिंपिक स्तरापर्यंत खेळाच्या अनेक स्पर्धा होतात. त्यामधून भावी खेळाडूचा शोध लावला जातो. चांगल्या, योग्य मार्गदर्शनामुळे खेळास, खेळाडूस योग्य प्रोत्साहन मिळते.
आपल्याला खेळामुळे हार-जीत कळते. खेळात हरल्यामुळे नाराज न होता आपण पुन्हा नव्या उमेदीने खेळतो, तसेच जिंकल्यानंतर हुरळून न जाता आपले कौशल्य वाढवत राहतो. यातून भावी जीवनात किती संकटे आली तरी धैर्याने आपण तोंड देऊ शकतो. असे अनेक चांगले गुण खेळामुळे वाढतात. आपल्यातील खेळाडू व्रुतीचा खरा विकास खेळामुळे होतो.
सचिन तेंडुलकर, सौरभ गांगुली, पी.टी.उषा, सानिया मिर्झा, अभिनव बिंद्रा, कविता राऊत, सायना नेहवाल इ. अनेक खेळाडूंनी आपल्या भारत देशाचे नाव जगात गाजवले आहे. खेळामुळे त्यांच्यातील कौशल्य सर्व जगास कळले आहे. जागतिक स्तरावर आपण कोठे आहोत हे खेळामुळे कळते. क्रिकेट, कबड्डी, हॉकी, खो- खो , बॅडमिंटन, टेनिस अशा अनेक सांघिक तसेच वैयक्तिक खेळातून खेळाडूची खरी ओळख बनते. निरीक्षणक्षमता, निर्णयक्षमता, कार्यक्षमता यांची वाढ खेळामुळे होते. मानसिक खेळामुळे बुद्धीमत्ता वाढते. खेळातून मनोरंजन होते.
आजच्या धकाधकीच्या युगात खेळाचे महत्त्व अमुल्य आहे जीवनाला योग्य वळण लावण्याचे कार्य खेळ करतो. आजची मुले विद्यार्थी उद्याचा भावी नागरिक अाहे. खेळाचे महत्त्व खूप आहे , हे विसरून चालणार नाही.
hope you like it.....