India Languages, asked by TransitionState, 10 months ago

जीवनातील विनोदाचे महत्व, स्थान मराठी निबंध, भाषण, लेख

Answers

Answered by fistshelter
73

Answer: मानवी जीवन हे धकाधकीचे आणि सुखदुःखाने भरलेले आहे. अशा या जीवनात विनोदामुळे काही क्षण का होईना हास्य अनुभवायला मिळते.

जीवनात सुखापेक्षा दु:खाचे क्षण जास्त असतात. दु:ख आहे त्या तीव्रतेने माणसाला भोगावे लागले, तर तो दु:खाच्या ओझ्याखाली एवढा दबून जाईल की त्याला जीवनातील उपलब्ध सुख उपभोगताही येणार नाही. अशावेळी विनोदाचे वरदान माणसाचे जीवन सुसह्य करते.

विनोदामुळे कोणाचे मन न दुखवता त्याला त्याचे दोष सांगता येतात. तसेच गुणही सांगता येतात. विनोदामुळे ताणतणाव कमी होतात. तसेच विनोदातून लोकांना शिक्षण सुद्धा देता येते.

म्हणून विनोद हा मानवी सुख आणि दु:ख यांच्यात सुवर्णमध्य साधतो.

Explanation:

Answered by delania5610
22

Answer:

हास्य' ही माणसाची सहज प्रवृत्ती आहे. माणसाला आपल्या दुःखाचा निचरा करण्यासाठी हास्य हा रामबाण उपाय सापडला आहे. म्हणूनच माणूस म्हणजे असणारा प्राणी ही माणसाची व्याख्या योग्य ठरते. हे हे हास्यविनोद यामुळे निर्माण होते. म्हणून तर मानवी जीवनात विनोदाला महत्त्व अनन्यसाधारण आहे.

सर्कशीत जे प्रयोजन विदूषकाचे तेच मानवी जीवनात विनोदाचे ! मानवी जीवन म्हणजे सुद्धा एक तारेवरची कसरत असते. ' सुख पाहता जीवा पडे। दुःख पर्वताएवढे।। संत तुकारामांनी मानवी जीवनात वर्णन केले आहे. या पर्वताएवढे दुःखा खाली चिरडून जाताना विनोदाचा आधार आवश्यक ठरतो. विनोदाने क्षणभर का होईना, पण दुःखाचा विसर पडतो. पण हा क्षणच माणसाचा हुरूप वाढून त्याचे आयुष्य सुसह्य करतो.

रामदास स्वामींनी ' टवाळा आवडे विनोद' असे लिहिले आहे. पण मला वाटते खुशी शब्दात त्यांनी मूर्खाची लक्षणे सांगणाऱ्या रामदासांना विनोदाचे वावडे असेल असे वाटत नाही. मानवी जीवनात अनेक तऱ्हेच्या विसंगती हे विनोदाचे उगमस्थान आहे. गुलाबाचे फुल आवडणारा माणूस जसा वेगळा, तसेच विनोद आवडणारा माणूसही वेगळाच असतो, माणसाला अगदी लहानपणापासून विनोदाचा परिचय असतो. लहान मुलांना सगळे प्राणी आवडतात; त्यांना माकड जास्त प्रिय असते, ते त्याच्या माकडचेष्टा मुळेच!

जीवनाकडे खेडकर दृष्टीने बघायला शिकवणारे साहित्यिक, नट, वक्ते, व्यंगचित्रकार लोकांना नेहमी हवेसेच वाटतात. लोकांची आयुष्य सुखकर करण्यात त्यांचा फार मोठा वाटा असतो. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, राम गणेश गडकरी, हे आजच्या पिढीला परिचित वाटत. प्र के अत्रे म्हणजे विनोद सम्राट! असे म्हणतात की, सभास्थानी अत्रे आले एवढी कुणी म्हटले तरीच सारे सभागृह खदखदून असे. पु ल देशपांडे आणि तर आपल्या विनोदी साहित्यांनी वाचकांच्या मनात हत्याचे मळे फुलवले आहेत. लोक आपल्या आयुष्यातील दुखाचा विसर पडावा म्हणून पुलंचे साहित्य वाचतात. शिवाय फुलाच्या विनोदी साहित्याला कारुण्याची झालर असते. त्यामुळे वाचकही अंतर्मुख होतो आत्मपरीक्षण करण्यास प्रवृत्त होतो.

Explanation:

hope you got your answer plz mark me as brainliest

Similar questions