Social Sciences, asked by intelegence5620, 10 months ago

ज्यू धर्माच्या शिकवणीत कोणत्या गुणांवर भर दिलेला आहे?

Answers

Answered by purva2004
1

ज्यू धर्म किंवा यहुदी धर्म हा जगातील एक प्रमुख धर्म आहे. हा धर्म अनुसरणाऱ्या व्यक्तींना ‘ज्यू’ किंवा यहूदी असे संबोधण्यात येते. ज्यू धर्माची स्थापना ३,००० वर्षांपूर्वी मध्यपूर्वेतील जुदेआ ह्या प्रदेशामध्ये झाली असा अंदाज आहे. ज्यू हा जगातील सर्वात जुन्या एकेश्वरवादी धर्मांपैकी (एका देवावर विश्वास) एक मानण्यात येतो. २०१० नुसार, जगामध्ये १.४३ कोटी लोक ज्यू धर्माचे अनुयायी आहेत, व त्यांचे जागतिक लोकसंख्येतील प्रमाण ०.२% आहे. जगातील ४१.१% ज्यू हे अमेरिकेत तर ४०.५% ज्यू हे इस्राईल मध्ये राहतात. इस्रायलमध्ये ७६% ज्यू असून, ज्यू धर्म हा या देशाचा राज्य धर्म (अधिकृत धर्म) आहे.

तनाख (हिब्रू बायबल) हा ज्यू धर्मामधील तीन प्रमुख ग्रंथांचे (तोराह, नेव्हीम व केतुव्हिम) एकत्रित रूप आहे. सिनेगॉग हे ज्यू लोकांचे प्रार्थनास्थळ असून रॅबाय हा ज्यू धर्मोपदेशक आहे. चानुका ह्या ज्यू धर्मामधील एक मोठा सण आहे.

ज्यू लोकांच्या चळवळीला ज्यूवाद तर ज्यू धर्मीय लोकांचा तिरस्कार अथवा द्वेष करणार्‍या तत्वाला ज्यूविरोध (अँटीसेमेटिझम) असे संबोधतात.

Similar questions